• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबई विमानतळावर लावलेल्या ‘अदानीं’च्या नामफलकाची शिवसेनेने केली तोडफोड

मुंबई विमानतळावर लावण्यात आलेल्या अदानींच्या नामफलकाला शिवसेनेचा विरोध

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 2, 2021
in Uncategorized
0
मुंबई विमानतळावर लावलेल्या ‘अदानीं’च्या नामफलकाची शिवसेनेने केली तोडफोड
Spread the love

मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | विमानतळाबाहेर लावण्यात आलेल्या अदानींच्या नामफलकाला शिवसेनेने विरोध केला असून तोडफोड केली आहे. शिवसैनिकांनी विमानतळाबाहेर लावलेल्या नामफलकाची तोडफोड करुन त्या ठिकाणाहून हटवला आहे. जीव्हीके कंपनीकडून ताबा मिळाल्यानंतर अदानी समूहाने अदानी एअरपोर्ट असे नामफलक लावले होते. त्याला शिवसैनिकांनी कडाडून विरोध केला असून नामफलकाची तोडफोड करण्यात आली. या ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थापनाचा ताबा १३ जुलैला अदानींकडे देण्यात आला आहे. यानंतर मुंबई विमानतळावर आणि बाहेर दोन्ही ठिकाणी अदानी विमानतळ असे नामफलक लावण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे असणाऱ्या विमानतळावर अदानींच्या नावे नामफलक लावण्यात आल्याने शिवसेनेकडून नाराजी जाहीर करण्यात आली होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर नाराजी व्यक्त केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर व्हीआयपी गेटवर अदानी एअरपोर्ट बोर्ड लावण्यात आल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले होते की, “ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळच आहे. शिवसेनेने त्यासाठी आंदोलन केलं होतं. त्यामुळे कोणा उद्योगपतींच्या नावे विमानतळ ओळखलं जाणार असेल तर ते मान्य नाही. ते महाराजांच्या नावेच ओळखलं जावं” अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली आहे. विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असून अदानीने आपलं नाव देऊ नये अशी शिवसेनेची मागणी आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून कार्यकर्त्यांना नियंत्रणात आणलं जात आहे. सध्या परिसरात तणावाचं वातावरण आहे.

दरम्यान या संदर्भात शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना सांगितले की, अदानीने कर्मचाऱ्यांना दिलेल्या टी-शर्ट्सवर अदानी विमानतळ लिहिलं आहे. दुर्बिणीने पाहावं लागेल इतकं छोटं महाराजांचं नाव बाह्यांवर आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे असेही त्यांनी सांगितले. सांगूनही जेव्हा दुर्लक्ष केलं जातं तेव्हा अशी प्रतिक्रिया दिली जाते. ते काय अदानी एअरपोर्ट आहे का ?. याआधी असणाऱ्या जीव्हीकेने असे बोर्ड लावले होते का?,” अशी विचारणा शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे.

Tags: airportमुंबई
Previous Post

दुकानांची वेळ वाढण्याचा आज निघणार आदेश; उद्धव ठाकरेंची माहिती

Next Post

माऊली हाॅस्पीटलमध्ये अमरीनने दिला तिळ्यांना जन्म …

Next Post

माऊली हाॅस्पीटलमध्ये अमरीनने दिला तिळ्यांना जन्म ...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!