• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

युवासेना, शिवसेना हा पक्ष किंवा संघटना नाही तर एक विचार आहे – गुलाबराव पाटील

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 5, 2021
in जळगाव, राजकीय
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | सत्ता हे साध्य नसून साधन आहे. नदीच्या प्रवाहात सहज पोहता येते मात्र प्रवाहाच्या विरुद्ध पोहायला ताकद लागते. ज्या काळात कॉंग्रेसची १००% सत्ता होती त्या काळात आम्ही एक विचार, एक झेंडा, एक नेता शिवसेना प्रमुख या विचाराने प्रवाहात विरुद्ध पोहोत सेनेत आलोत. याच प्रमाणे युवा सेना महत्वाची असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात केले. युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या युवा सेना पदाधिकारी संवाद दौऱ्यात ते बोलत होते.
युवा सैनिक हे कच्चामाल असतात. जोपर्यंत कंपनीत कच्चामाल येत नाही तोपर्यंत पक्का माल तयार होऊ शकत नाही. युवा सेना किंवा शिवसेना हा पक्ष किंवा संघटना नाही. तो एक विचार आहे, आणि विचार संपत नाहीत. शिवसेना संपली असं बऱ्याच नेत्यांनी सांगितलं. मात्र काहीही फरक पडला नाही. आम्ही निवडून आलो. आता युवा सैनिकांची गरज आहे. कार्डवर छापण्यापुरते पद घेऊ नका. पद वशिल्याने नाहीतर कामाने मिळाले पाहिजे असेही पालकमंत्री म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल बोलतांना ते म्हणाले, ज्या माणसाला कोणतेही पद मिळाले नव्हते असे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. दरम्यान कोरोनाचे महासंकट आले. कोरोनाने संपूर्ण जगावर विळखा घातला. मात्र मुख्यमंत्र्यांनी अगदी संयमाने काम केले. त्यांच्या कामाची दखल प्रत्यक्ष सुप्रीम कोर्टाने घेऊन संपूर्ण देशात वरळी पॅटर्न राबवण्याचा सल्ला दिला.

युवासेने बद्दल बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तरुणांनी सभासद नोंदणी करणे गरजेचे असल्याचे सांगितले. ही नोंदणी करताना आपले शिक्षणही नमूद करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या शिक्षणावरून त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याची योजना आखण्याची विनंती युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांना केली. तरुणांनी कामाची लाज धरू नये, तरच तुम्ही श्रीमंत व्हाल. कामात अडथळे येतील मात्र हरू नका. पुन्हा नव्याने उभे राहा. आम्हीही निवडणुका हरतो मात्र पुन्हा नव्याने उभे राहतो असे बोलून पालकमंत्री म्हणाले, ज्या दिवशी तुमच्यातले आंदोलन तुमच्यातला कार्यकर्ता संपेल त्या दिवशी तुम्ही मृतदेह झालेले असाल.

दरम्यान, युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी युवा स्किल योजनेच्या अंतर्गत तरुणांसाठी रोजगार उपलब्ध केला जाईल असे सांगितले. तरुणांसाठी युवा सेनेच्या माध्यमातून भविष्यात बरीच कामे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला युवा सेनेचे विस्तारक कुणाल दराडे, युवा सेनेचे सहसचिव रूपेश कदम, युवा सेनेचे कोअर कमिटी सदस्य योगेश निमसे, युवा सेनेचे विस्तारक अजिंक्य चुंभळे यांच्यासह शिवसेनेचे जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, महापौर जयश्री सुनिल महाजन, जिल्हा परिषदेचे सदस्य प्रतापराव पाटील, उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, हर्षल माने, माजी महापौर नितीन लढ्ढा, बुलडाणा संपर्कप्रमुख किशोर भोसले, महापालिका विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, महानगरप्रमुख शरद तायडे, विराज कवदिया, अमित जगताप उपस्थित होते. सूत्रसंचालन अपूर्वा वाणी यांनी केले.

Tags: gulabrao patiljalgaonpalakmantrishivsenayuva senayuva sena sachiv varun sardesai
Previous Post

हायकोर्टाने ठाकरे सरकारला खडसावलं.. म्हणले..

Next Post

पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीच्या वारसाला पालकमंत्र्यांच्या हस्ते 4 लाखांचा धनादेश सुपूर्द…

Next Post

पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीच्या वारसाला पालकमंत्र्यांच्या हस्ते 4 लाखांचा धनादेश सुपूर्द...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!