• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चिमुकलीचा जीव वाचवण्यासाठी सरसावले पालकमंत्री !

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 11, 2021
in जळगाव, राजकीय
0
Spread the love

आर्थिक मदतीसह हॉस्पीटलमध्ये भेटून दिला आधार

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची सर्वसामान्यांशी जुळलेली नाळ ही किती घट्ट आहे याची प्रचिती देणारी एक घटना आज घडली असून दुर्धर व्याधीशी दोन हात करणार्‍या चिमुकलीच्या उपचारासाठी त्यांनी स्वत: आर्थिक मदत तर केलीच, पण हॉस्पीटलमध्ये भेट देऊन तिला व तिच्या कुटुंबाला धीर देखील दिला.

याबाबत वृत्त असे की, धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील कुमारी मेघना अरूण माळी ही जि.प. उच्च प्राथमिक शाळेतील पाचव्या इयत्तेत शिकणारी बालिका सध्या गिलीन बार सिंड्रोम म्हणजेच जीबीएस या दुर्धर व्याधीशी झुंजत आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिच्या घरची आर्थिक स्थिती यथातथा असल्याने कुटुंबाने असेल ती पुंजी जमा करून लावली तरीही खर्च पुरेना झाला. यामुळे काही जणांनी मदतीचा हात दिला तरी अजून पैसे लागत होते. ही माहिती मिळताच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी थेट नाशिक येथे मेघना उपचार घेत असलेल्या वसंतराव पवार मेडिकल कॉलेजचे हॉस्पीटल गाठून तिला धीर दिला.

याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मेघनाचा उपचारासाठी तात्काळ एक लाख रूपयांची आर्थिक मदत करून पुढील उपाचारासाठीही लागेल ती मदती साठी कटिबद्ध असून तसेच तिला आणि तिच्या कुटुंबाला काहीही लागले तर हक्काने सांगा…आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे सांगून आश्‍वस्त देखील केले.

पालकमंत्र्यांचे आपल्या मतदारांवरील प्रेम पाहून मेघनासह तिचे कुटुंब भारावून गेले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, नारायण आप्पा सोनवणे, मंत्रालयातील स्वीय सहाय्यक एन.एस. पाटील आदी उपस्थित होते.

Tags: jalgaonjalgaon jilha shivsenapalakmantri gulabrao patil
Previous Post

आपत्कालीन सायरन वाजला अनं पोलीस प्रशासनही चक्रावले..!

Next Post

रिंग रोडवर जलवाहिनी फुटल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी

Next Post

रिंग रोडवर जलवाहिनी फुटल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!