• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रोहिणी खडसेंनी घेतली जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 12, 2021
in राजकीय
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | माजी महसूलमंत्री राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांची कन्या व जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी आज राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील बोदवड परिसर उपसा सिंचन योजना, कुऱ्हा वढोदा इस्लामपुर उपसा सिंचन योजना, मुक्ताई उपसा सिंचन योजना, वरणगाव तळवेल उपसा सिंचन योजना या अपुर्ण अवस्थेत असलेल्या उपसा सिंचन योजनांची आढावा बैठक घेऊन निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली.

याबाबत जलसंपदा मंत्र्यांना माहिती देताना ॲड.रोहिणी खडसे यांनी सांगितले की, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे पाटबंधारे मंत्री असताना त्यांनी तापी खोरे विकास महामंडळ स्थापन केले. या महामंडळाअंतर्गत पूर्णा तापी नदीचे वाहून जाणारे पाणी मुक्ताईनगर बोदवड कुऱ्हा परिसरातील शेतीचे कोरडवाहू क्षेत्र बागायती खाली येण्यासाठी लिफ्ट इरिगेशन द्वारे उपसुन शेतीला देण्यासाठी या महामंडळाच्या अंतर्गत बोदवड उपसा सिंचन योजना, कुऱ्हा वढोदा इस्लामपुर उपसा सिंचन योजना, मुक्ताई उपसा सिंचन योजना, वरणगाव तळवेल उपसा सिंचन योजना या योजनांची मुहूर्तमेढ रोवली गेली. या योजनांचे काम सुरु आहे. परंतु या उपसा सिंचन योजनांचे काम पूर्णत्वास जाऊन मुक्ताईनगर, बोदवड परिसर सुजलाम सुफलाम होण्यासाठी सदर योजनांना भरीव निधीची आवश्यकता आहे. यातील मुक्ताई उपसा सिंचन योजनेचे ८०% काम पूर्ण झाले आहे. बोदवड उपसा सिंचन योजना, कुऱ्हा-वढोदा इस्लामपूर सिंचन योजनेचे काम निधी अभावी संथ गतीने सुरु आहे.

या उपसा सिंचन योजना पूर्णत्वास जाणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी निधीची उपलब्धता व्हावी तरी बोदवड परिसर उपसा सिंचन योजना, कुऱ्हा वढोदा इस्लामपुर उपसा सिंचन योजना, मुक्ताई उपसा सिंचन योजना, वरणगाव तळवेल उपसा सिंचन योजना या अपुर्ण अवस्थेत असलेल्या उपसा सिंचन योजनांची आढावा बैठक घेऊन निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली. यावर जलसंपदा मंत्री नामदार जयंतराव पाटील यांनी पुढील आठवड्यात उपसा सिंचन योजनांची आढावा बैठक घेण्यात येईल व निधीची उपलब्धता करून देण्यात येईल असे आश्वासन दिले.

यावेळी ॲड.रोहिणी खडसे यांच्यासोबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष ,जि प सदस्य रविंद्र पाटील,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष पं स सदस्य दिपक पाटील, रावेर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील उपस्थित होते.

Tags: jayant patilmumbairohini khadse
Previous Post

काय आहे कारण? खरात टोळी दोन वर्षे तडीपार..!

Next Post

महापौर, विरोधीपक्ष नेत्यांना पायलट कल्याणी पाटलांची कामगिरी भावली…!

Next Post

महापौर, विरोधीपक्ष नेत्यांना पायलट कल्याणी पाटलांची कामगिरी भावली...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!