• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वृत्तपत्रांची थकीत बिलं तात्काळ चुकती करावीत, मराठी पत्रकार परिषदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 14, 2021
in धुळे
0
वृत्तपत्रांची थकीत बिलं तात्काळ चुकती करावीत, मराठी पत्रकार परिषदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Spread the love

 

धुळे राजमुद्रा वृत्तसेवा |  राज्यातील छोट्या आणि मध्यम वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या सरकारी जाहिरातींची कोट्यवधींची थकबाकी सरकारकडून येणे बाकी आहे. ही रक्कम सरकारने त्वरित चुकती करावीत, अशी मागणी मराठी परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

एस.एम. देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे राज्यातील वृत्तपत्र व्यवसाय मोडकळीस आलेला आहे. सर्वच वृत्तपत्रे आर्थिक अडचणीत सापडलेली असल्याने त्यांच्या समोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकार वृत्तपत्रे आणि पत्रकारांसाठी कोणताच दिलासा देताना दिसत नाहीत. उलट वृत्तपत्रातून प्रसिद्ध  झालेल्या जाहिरातींची बिलं देखील दिली जात नसल्याने संकट अधिकच उग्र झालं आहे. युतीच्या काळात विद्यमान अर्थमंत्री अजित पवार यांनी वृत्तपत्रांची बिलं त्वरित द्यावीत अशी मागणी विधान सभेत केली होती.  म्हणजे त्यांना विषयाचे गांभीर्य माहिती आहे.  आज अजित पवार स्वतः अर्थमंत्री असताना देखील बिलं दिली जात नसल्याबद्दल देशमुख यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.  महाआघाडी सरकारने  वृत्तपत्रांचा अधिक अंत न पाहता तातडीने वृत्तपत्रांची थकित बिलं चुकती करावीत अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.

सरकारकडे वारंवार अर्ज, विनंत्या करून देखील सरकार पाच-पाच वर्षे बिलं देत नसल्याच्या निषेधार्थ बीड जिल्ह्यातील वृत्तपत्र मालक स्वातंत्र्यदिनी म्हणजे १५ ऑगस्ट रोजी बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उषोषण करीत आहेत. मराठी पत्रकार परिषदेने या आंदोलनास पाठिंबा जाहीर केला असून स्वतः एस.एम.देशमुख काही वेळ या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेच्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे. पत्रकावर विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. बीड जिल्ह्यातील  वृत्तपत्रांची जवळपास दीड कोटींची थकबाकी सरकारकडून येणे आहे.  यातील काही बिलं तर २००० पासून प्रलंबित आहेत.

Tags: dhulerajya marathi patrakar sanghs m deshmukh
Previous Post

आघाडी सरकारने मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये – भाजपा खा. सुभाष भामरे

Next Post

भाजपाच्या चार केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यात १६ ऑगस्टपासून जन आशीर्वाद यात्रा

Next Post
भाजपाच्या चार केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यात १६ ऑगस्टपासून जन आशीर्वाद यात्रा

भाजपाच्या चार केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यात १६ ऑगस्टपासून जन आशीर्वाद यात्रा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!