• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारती पवार यांची राज्य सरकारवर टीका; म्हणाल्या सर्वाधिक लसी….!

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 16, 2021
in राजकीय
0
भारती पवार यांची राज्य सरकारवर टीका; म्हणाल्या सर्वाधिक लसी….!
Spread the love

मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या जनआशीर्वाद यात्रेला आज पालघरमधून सुरुवात होत आहे. त्यांच्या या यात्रेमध्ये विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही सहभागी झाले आहेत. मोदी सरकारच्या कामाची, महत्त्वाच्या निर्णयांची माहिती जनतेला देण्यासाठी त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारमधील त्रुटी दाखवण्यासाठी ही यात्रा आयोजित केली असल्याचं पवार यांनी सांगितलं. कोविड प्रतिबंधाचे नियम पाळून जास्त गर्दी न करता ही यात्रा करणार असल्याचंही पवार यांनी सांगितलं.

भारती पवार यांची ही जनआशीर्वाद यात्रा पालघर, मनोर, चारोटी, तालसरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडामार्गे जाणार आहे. केंद्रीय मंत्री म्हणून स्थानिक आरोग्यसुविधांना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे हे पाहणं आपली जबाबदारी असल्याचं भारती पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. केंद्र सरकारने सर्वाधिक लसी महाराष्ट्राला उपलब्ध करुन दिल्या आहेत. परंतु, राज्य सरकार तरीही लसींचा पुरवठा होत नाही अशी तक्रार करत आहे, अशा शब्दांत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

“आपल्या या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान ग्रामीण भागातल्या लसीकरणाची माहिती घेणं, त्यांच्या अडचणी जाणून घेणं ही आपली जबाबदारी आहे. कोणीही आरोग्य सुविधांपासून वंचित राहू नये हाच या जनआशीर्वाद यात्रेचा हेतू असणार आहे”, अशी माहिती भारती पवार यांनी दिली.

Tags: bharti pawarcivid lasikaranrajya sarkar
Previous Post

स्वातंत्र्यदिनी भाजप मुक्ताईनगर युवा मोर्चातर्फे माजी सैनिकांचा सत्कार

Next Post

आता दस्त नोंदणीचे अधिकार मिळणार बिल्डरांना

Next Post
आता दस्त नोंदणीचे अधिकार मिळणार बिल्डरांना

आता दस्त नोंदणीचे अधिकार मिळणार बिल्डरांना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!