• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आ. चंद्रकांत पाटील यांचे शेतकऱ्यांसह जलसमाधी आंदोलन

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 16, 2021
in राजकीय
0
आ. चंद्रकांत पाटील यांचे शेतकऱ्यांसह जलसमाधी आंदोलन
Spread the love

 

मुक्ताईनगर राजमुद्रा वृत्तसेवा | ओझरखेडा धरणात पाणी सोडण्यात यावे आणि याला दोषी असणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, या मागण्यांसाठी १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता आ चंद्रकांत पाटील हे शेतकऱ्यांसह जलसमाधी आंदोलन करणार आहेत.

याबाबत प्राप्त माहिती अशी की, सध्या पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यापूर्वी वरणगाव उपसा सिंचन योजने अंतर्गत असलेल्या ओझरखेड धरण पाणलोट क्षेत्रात शेतकऱ्यांचे पीक संकटात आल्याने शेतकऱ्यांनी आ. चंद्रकांत पाटील यांच्याकडे धाव घेतली होती. आ. चंद्रकांत पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांची आढावा बैठक घेतली. धरणात तातडीने पाणी सोडण्यासाठी चर्चा करण्यात आली.

पालकमंत्र्यांनी नियमित देखभाल व दुरुस्तीसाठी कार्यकारी संचालक यांच्याशी चर्चा करून निधी उपलब्ध करून दिला होता. परंतु जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात आजतागायत  कार्यतत्परता दाखवली नाही. दरम्यानच्या काळात मुबलक पूरस्थिती हतनूर धरणाला सुरु होती. अशा परिस्थितीत पाणी ओझरखेडा धरणात फुल फील झाले असते. परंतु संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे धरण कोरडेठाक होण्याच्या मार्गावर आहे.

या पाणलोट क्षेत्रातील हजारो एकर शेती व इतर पिके त्यामुळे संकटात सापडले आहेत. या संदर्भात चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना मुंबई येथे व जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच धरणात पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी आ. चंद्रकांत पाटील आंदोलन करणार आहेत.

Tags: muktainagarozarkheda dam
Previous Post

‘सीबीआय’ च्या धाडीने भुसावळ रेल्वे विभागात खळबळ

Next Post

अखेर आ. चंदुलाल पटेल यांना अटकपूर्व जामीन मंजूर

Next Post
तथाकथित एजंट पोलिसांच्या नजरेत… बी एच आर प्रकरण

अखेर आ. चंदुलाल पटेल यांना अटकपूर्व जामीन मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!