• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संभाजी ब्रिगेड राज ठाकरेंना पाठवणार प्रबोधनकारांचे साहित्य

'त्या' प्रकरणावर आता जोरदार शाब्दिक युद्ध

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 17, 2021
in महाराष्ट्र, राजकीय
0
संभाजी ब्रिगेड राज ठाकरेंना पाठवणार प्रबोधनकारांचे साहित्य
Spread the love

 

पुणे राजमुद्रा वृत्तसेवा | पुण्यातील संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पोस्टानं प्रबोधनकार ठाकरेंचे साहित्य पाठवणार आहेत. राज ठाकरेंनी प्रबोधनकारांच साहित्य वाचावं आणि तसा वैचारिक वारसा जपावा, असा सल्लाही संभाजी ब्रिगेडने दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. याशिवाय राज ठाकरेंनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिखणात दंतकथा नसल्याचा दावा केला होता. त्यानंतर राज ठाकरे आणि संभाजी ब्रिगेड यांच्यातील वाद उफाळला आहे. इतकंच नाही तर राज ठाकरे यांच्या आरोपानंतर खुद्द शरद पवारांनीही उत्तर दिलं होतं.

राज ठाकरे यांच्यावर न बोललेलंच बरं, त्यांनी प्रबोधनकारांचे लिखाण वाचावे, असा सल्ला शरद पवारांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलताना दिला होता. शरद पवारांनीही राज ठाकरेंना प्रबोधनकारांचं साहित्य वाचण्याचा सल्ला दिल्यानंतर, संभाजी ब्रिगेडने थेट कृती करण्यास सुरुवात केली आहे. आता संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते राज ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरेंची पुस्तकं कुरिअर करणार आहेत.

हिंदुत्वाच्या राजकारणाला शह देण्यासाठी महाराष्ट्रात जातीचं राजकारण सुरू झालं आहे का?, असा सवाल राज यांना करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप केला होता.

राज्यात आधीपासूनच जाती होत्या. पण जाती अभिमान बाळगण्यापुरत्याच होत्या. पण गेल्या २० वर्षापासून चित्रं बदललं. लोक जातीचा अभिमान बाळगण्याबरोबरच इतर जातींचा तिरस्कार करू लागले आहेत. हे सर्व राजकीय स्वार्थातून होत आहे. जातीचा मुद्दा हा तर नेत्यांची आयडेंटीटी होत आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीचा मुद्दा सर्वार्थाने मोठा झाला, असं राज म्हणाले होते.

राज ठाकरे यांना बाबासाहेब पुरंदरे यांच्यापलीकडे इतिहासाचे आकलन नाही, अशी टीका संभाजी ब्रिगेकडून करण्यात आली आहे. राज ठाकरेंना जसे पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, तसेच त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचेही आकलन नाही. राजकारणात कुठलेही नवनिर्माण करता न आलेला आणि राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला हा माणूस आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हा सगळा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करत दिसत आहे, अशी टीका प्रवीण गायकवाड यांनी केली आहे.

Tags: maharashtraprabodhankar thakrepuneraj thakresambhaji brigedshrad pawar
Previous Post

रुपाली चाकणकरांचा चंद्रकांत पाटलांना टोला; तुमच जेवढं वय तेवढी…!

Next Post

भुसावळ रेल्वेतील मंडल अभियंत्यांसह ओएसला २० ऑगस्ट पर्यंत सीबीआय कोठडी

Next Post
भुसावळ रेल्वेतील मंडल अभियंत्यांसह ओएसला २० ऑगस्ट पर्यंत सीबीआय कोठडी

भुसावळ रेल्वेतील मंडल अभियंत्यांसह ओएसला २० ऑगस्ट पर्यंत सीबीआय कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!