• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

घरगुती एलपीजी सिलेंडरमध्ये पुन्हा २५ रुपयांची वाढ

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 18, 2021
in राष्ट्रीय
0
एल.पी.जी गॅस सिलेंडरचा भडका…
Spread the love

 

राजमुद्रा वृत्तसेवा | पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा एलपीजीच्या किंमतीत वाढ केली असून पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या बजेट मध्ये भूकंप येणार आहे.  विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत पुन्हा २५ रुपयांची वाढ करण्यात आली असून सोमवारी रात्रीपासूनच ही वाढ लागू झाली आहे. या वाढीनंतर दिल्लीमध्ये घरगुती वापरासाठी १४.२ किलो एलपीजी सिलेंडरची किंमत ८५९.५ रुपयांवर गेली आहे. १४.२ किलो एलपीजी सिलेंडरची कोलकातामध्ये ८८६ रुपये, मुंबईत ८५९.५ रुपये आणि लखनऊमध्ये ८९७.५ रुपये झाली आहे. त्याचप्रमाणे १९ किलो व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीतही ६८ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत त्यांची किंमत वाढून १६१८ रुपये झाली आहे.

२०२१ च्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारीत दिल्लीत एलपीजी सिलेंडरची किंमत ६९४ रुपये होती, जी फेब्रुवारीमध्ये वाढून ७१९ रुपये प्रति सिलेंडर करण्यात आली. १५ फेब्रुवारीला पुन्हा किंमत वाढून ७६९ रुपये करण्यात आली. यानंतर, २५ फेब्रुवारी रोजी एलपीजी सिलेंडरची किंमत कमी होऊन ७९४ रुपये झाली. मार्चमध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत ८१९ रुपये करण्यात आली. एप्रिलच्या सुरुवातीला १० रुपयांची कपात केल्यानंतर दिल्लीत घरगुती एलपीजीची किंमत ८०९ रुपयांवर गेली होती. एका वर्षात एलपीजी सिलेंडरच्या किमतीत १६५.५० रुपयांची वाढ झाली आहे. तर डिसेंबरपासून आतापर्यंत सिलिंडरच्या किमतीत सुमारे २७५ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमधून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

Tags: dar wadhdelhikendra sarkarlpg gas
Previous Post

भारतात कोविशिल्डच्या बनावट लसी; WHO चा सतर्कतेचा इशारा..

Next Post

अपूर्ण माहितीच्या आधारावर माझ्यावर आरोप लावले जात आहेत – जिल्हा शल्यचिकित्सक एन एस चव्हाण

Next Post

अपूर्ण माहितीच्या आधारावर माझ्यावर आरोप लावले जात आहेत - जिल्हा शल्यचिकित्सक एन एस चव्हाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!