• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘मुख्यमंत्र्यांमध्ये दम नाही, ते पिंजऱ्यात राहतात’ – नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका..

शिवसेनेत फक्त झाडावर उड्या मारणारे राहिलेत..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 19, 2021
in राजकीय
0
‘मुख्यमंत्री महाराष्ट्राला उध्वस्त करायला निघालेत, भाजपचे सरकार पुन्हा येणार’ – नारायण राणे
Spread the love

 

मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे सध्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने मुंबईमध्ये आहेत. आज सकाळी नारायण राणेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर जाऊन आदरांजली वाहिली. आधी मुंबई विमानतळ, नंतर बाळासाहेब स्मारक आणि दुपारी परळ या भागात नारायण राणेंनी स्थानिक जनतेशी संवाद साधला. या प्रत्येक वेळी नारायण राणेंनी मुंबई महानगर पालिका निवडणुका आणि शिवसेना या मुद्द्यांना हात घालत टीकास्त्र सोडलं आहे. परळमध्ये बोलताना नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर खोचक टीका करतानाच आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकांमध्ये सत्तापालटाचा आत्मविश्वास व्यक्त केला.

“मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेनेची स्थापना झाली, मग मराठी माणसाच्या जीवनात हे परिवर्तन का करू शकले नाहीत? मातोश्रीचं परिवर्तन झालं, एकाचे दोन बंगले झाले, पण मराठी माणसाच्या आयुष्यात काहीही बदल नाही. आजही अनेक शिवसैनिकांमध्ये बेकारी आहे. ही पाळी का आणावी?”, असा सवाल नारायण राणे यांनी परळमध्ये बोलताना विचारला आहे.

यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील लक्ष्य केलं. “या राज्याचे मुख्यमंत्री कुणी आहेत असं मला वाटतच नाही. काही दम नाही. कसले मुख्यमंत्री, पिंजऱ्यात राहातात, मातोश्रीच्या बाहेर निघत नाहीत. जनतेमध्ये जायला पाहिजे, प्रश्न बघायला पाहिजेत. मी मुख्यमंत्री असताना सगळ्यांनी पाहिलंय मी कसं काम केलं”, असं ते म्हणाले.

“३२ वर्षांत बकाल करून टाकली मुंबई. किती माणसं मुंबईत करोनामुळे गेले, कुणामुळे? औषधामध्ये देखील यांनी पैसे खाल्ले आहेत. शिवसेनेने अशी वेळ आणू नये की कसे पैसे खाल्ले हे मी लोकांसमोर उघड करीन. जनतेचा दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सोडवा आणि मग काय करायचं ते करा”, असं राणेंनी यावेळी नमूद केलं.

दरम्यान, नारायण राणेंना बाळासाहेब ठाकरे स्मारकावर दर्शनासाठी जाऊ देणार नाही, अशी भूमिका आधी काही शिवसैनिकांनी घेतली होती. मात्र कोणतीही अडवणूक न होता त्यांनी स्मारकाला भेट दिली. या पार्श्वभूमीवर नारायण राणेंनी शिवसेनेवर खोचक टीका केली. “बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावर मी मानवंदना देण्यासाठी जाऊ नये यासाठी प्रयत्न झाले. कुणी मला अडवायला तरी आलं पाहिजे. पण कुणीच आलं नाही. माणसं राहिलेच नाहीयेत शिवसेनेत. झाडावर उड्या मारतात, तेवढेच उरलेत”, असा टोला राणेंनी लगावला.

Tags: jan aashirwad yatramukhyamantri uddhav thakremumbainarayan raneshivsena vs bhajap
Previous Post

आ. गिरीश महाजन यांनी आपल्यापुरतेच बोलावे – कॉंग्रेसचे डी जी पाटील यांचा सल्ला

Next Post

प्रशांत गाढे यांच्या खडसेंच्या गाण्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post
प्रशांत गाढे यांच्या खडसेंच्या गाण्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रशांत गाढे यांच्या खडसेंच्या गाण्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!