• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सातपुड्यातील गावांसाठी विशेष आरोग्य शिबीर

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 19, 2021
in जळगाव
0
सातपुड्यातील गावांसाठी विशेष आरोग्य शिबीर
Spread the love

 

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या कुशीत असलेल्या गावांसाठी जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुढाकाराने विशेष आरोग्य शिबीरासह आदिवासी विकास विभागाच्या योजना, त्यांचे संरक्षण आणि कायदे,आपात्कालीन कार्य, वन्यजीव जनजागृती, कोरोना विषयक जनजागृती व लसीकरण मोहीम राबविण्यात आली.

रावेर आणि यावल तालुक्यातील गारखेडा, उसमळी, जामन्या, गाडऱ्या आणि लंगडाआंबा या भागातील आदिवासी बांधवांसाठी विशेष शिबिराचे आयोजन बुधवारी सातपुडा विकास मंडळ, पाल संचलित जामन्या येथील आश्रमशाळेत करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. ए. ए. शेख हे होते. तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंह रावळ, अँड. सागर चित्रे, विजय दर्जी, शरद न्हायदे, यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी निलेश पाटील, नायब तहसीलदार आर. डी. पाटील सहायक पोलीस निरीक्षक पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरूवातीस बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यांनतर गटविकास अधिकारी निलेश पाटील यांनी प्रास्ताविकात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कामकाजाविषयी व कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी सविस्तर माहिती दिली.

जंगलात सर्पदंश झाल्यास करावयाचा आपात्कालीन प्रथमोपचार या विषयावर सर्पमित्र जगदीश बैरागी, राजेश सोनवणे, गौरव शिंदे, कल्पेश तायडे यांनी मार्गदर्शन केले. आरोग्य विषयक योजनांची माहिती ग्रामीण रूग्णालय, पालचे वैद्यकीय अधिकारी डॉ बी. बी. बारेला यांनी दिली.

या शिबिरात जिल्हाधिकारी अभिजित राउत व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. बारेला यांनी स्थानिक पावरा भाषेत नागरिकांना मार्गदर्शन करून कोरोना प्रतिबंधक  लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन या गावातील अनेक नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

या गावांमध्ये अगोदर आदिवासी बांधव लस घेण्यास तयार नव्हते, त्याच गावातील नागरिकांनी यावेळी याठिकाणी लस घेतली हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरल्याचे डाॅ. बारेला यांनी सांगितले. या नागरिकांना मुख्य अधिपरिचरिका सौ. कल्पना नगरे व परिचारिका शाबजान तडवी यांनी लस दिली.

कार्यक्रमास जामन्याचे पोलीस पाटील, सत्तरसिंग बारेला, सरपंच काशिनाथ बारेला, माजी सरपंच भरत बारेला, प्रताप बारेला, वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष  व मानद सचिव रवींद्र फालक, अधीक्षक रविद्र ठाकूर. वनपाल ललित सोनार, लालसिंग बारेला, तेरसिंग बारेला, भरत बारेला, दारासिंग बारेला, बिर्ला बारेला, देवसिंग बारेला आदी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक रमेश साबळे, प्राथमिक मुख्याध्यापिका हेमलता सावकारे, एम. डी. नरवाडे, प्रवीण चव्हाण, एस.पी. नामायते, अधीक्षक सुभाष गाढे, एन. व्ही. ढाके, अनिल तडवी, राजेंद्र कांचोळे, मामाज पवार, राजेंद्र पाटील, गीरासिंग बारेला,, गणेश प्रजापती, कस्तुरा बारेला, निलेश बारेला, वीरेंद्र बारेला, जमेला तडवी, विठ्ठल मेढे यांनी घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार बाळकृष्ण देवरे यांनी मानले.

आरोग्य तपासणी करण्यासाठी डॉ बी. बी. बारेला, डॉ सचिन पाटील, डॉ. भोईटे, डॉ. ठाकरे, मुख्य अधिपरिचारिका सौ. कल्पना नगरे, अधिपारीचारक अरिहंत पाटील, औषध निर्माता पी. एम. पाटील,  परिचारिका राबजान तडवी, गोविंद पवार यांच्यासह ग्रामीण रुग्णालय. पाल व प्राथमिक आरोग्य केंद्र. सावखेडा ता. यावल येथील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. अशी माहिती डॉ बारेला यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहेत.

Tags: jalgaon
Previous Post

गैरव्यवहार करणार्यांवर कारवाई करणार – ना. विश्वजित कदम

Next Post

स्मारकाचं शुद्धिकरण करण्यापेक्षा आधी मन शुद्ध करा – नारायण राणेंचा शिवसेनेला टोला

Next Post
स्मारकाचं शुद्धिकरण करण्यापेक्षा आधी मन शुद्ध करा – नारायण राणेंचा शिवसेनेला टोला

स्मारकाचं शुद्धिकरण करण्यापेक्षा आधी मन शुद्ध करा – नारायण राणेंचा शिवसेनेला टोला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!