• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महापौर, उपमहापौरांकडून परिचारिकांचा सन्मान

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 13, 2021
in जळगाव
0
Spread the love

(राजमुद्रा जळगाव) महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी काल (12) पहिल्या महासभेसाठी जाण्यापूर्वी जागतिक परिचारिका दिनानिमित्त सिंधी कॉलनीतील महापालिकेचे कै. चेतनदास मेहता व पंचमुखी हनुमान मंदिराजवळील स्व. श्रीमती नानीबाई सूरजमल अग्रवाल रुग्णालयास भेट दिली. तसेच सायंकाळी सव्वापाचला मोहाडी रोडवरील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व महिला रुग्णालयास महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी भेट दिली. त्याचप्रमाणे ‘महापौर सेवा कक्ष’च्या माध्यमातून विविध रुग्णालयांशी संपर्क साधण्यात आला. अशा एकूण 142 हॉस्पिटलमधील 1200 हून अधिक परिचारिकांचा भेटकार्ड व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कै. चेतनदास मेहता रुग्णालयात डॉ. सुजाता पाटील व डॉ ठुसे यांनी महापौर, उपमहापौरांचे स्वागत केले. त्यानंतर महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी तेथील कर्मचार्‍यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले व जागतिक परिचारिका दिनाचे महत्त्व सांगणारे फलक रुग्णालयात लावण्यासाठी भेट दिले. तसेच शोभा कोगटे, हर्षदा शिलेदार, ममता बोदडे, अनिता भदाणे, शबिरा तडवी, लक्ष्मी सरघटे, सुरेखा वडनेरे, मीरा चंडाळे आदी परिचारिकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या व सर्वांप्रती कृतज्ञताही व्यक्त केली.

स्व. श्रीमती नानीबाई सूरजमल अग्रवाल रुग्णालयास भेटीवेळी डॉ सोनल कुलकर्णी व डॉ प्रियंका अत्तरदे यांनी महापौर, उपमहापौरांचे स्वागत केले. त्यानंतर महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी तेथील कर्मचार्‍यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले व जागतिक परिचारिका दिनाचे महत्त्व सांगणारे फलक रुग्णालयात लावण्यासाठी भेट दिले. तसेच शिवानी परदेशी, दीपाली बोरनारे, सीमा परदेशी, सुमन सरताले, वैशाली वंजारी, मंगला दायमा, स्वाती रेखी, भावना भिरूड आदी परिचारिकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

मोहाडी रोडवरील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व महिला रुग्णालयात अधीक्षक डॉ.मिलिंद निकुंभ, डॉ.रितेश पाटील डॉ. प्रवीण पाटील, डॉ. शिल्पा अमोल पाटील, डॉ. शिल्पा पाटील (आयुर्वेद) यांनी महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांचे स्वागत केले. यावेळी उभयतांत रुग्णालयातील सोयी-सुविधा, कोविड रुग्णांची केली जात असलेली सुश्रूषा यासंदर्भात चर्चा झाली. त्यानंतर महापौर सौ. महाजन यांनी सविता शिर्के, नम्रता वानखेडे, सोनाली हसबंद, नेहा राजपूत आदी परिचारिकांचा भेटकार्ड व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व परिचारिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महापौरांकडून झालेल्या या छोटेखानी सत्कारामुळे परिचारिकांनी समाधान व्यक्त केले.

Tags: aarogy vibhagcoronamahapaur jayashree mahajanupmahapaur kulbhushan patil
Previous Post

” पंधरा महिन्यापासून आम्ही सहकार्य करीत आहोत आता मात्र आम्ही हतबल झालो आहोत ; जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या वेदना…

Next Post

मांडळ धरणातून बोरी नदी पात्रात पाणी सोडावे जिल्हाधिकारी संजय यादवांचा आदेश

Next Post

मांडळ धरणातून बोरी नदी पात्रात पाणी सोडावे जिल्हाधिकारी संजय यादवांचा आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!