• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

किरीट सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक केल्याचा शिवसैनिकांवर आरोप..!

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 20, 2021
in महाराष्ट्र, राजकीय
0
किरीट सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक केल्याचा शिवसैनिकांवर आरोप..!
Spread the love

 

राजमुद्रा वृत्तसेवा | शिवसैनिकांनी माझ्या गाडीवर दगडफेक केल्याचा आरोप भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांनी आपल्या गाडीचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये गाडीवर शाई फेकण्यात आल्याचं दिसत आहे. सोमय्या यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हे केल्याचा आरोप करत त्यांना गुंड असं म्हटलं आहे.

दुपारी पाऊणच्या सुमारास केलेल्या ट्विटमध्ये सोमय्या यांनी दोन फोटो पोस्ट केले आहेत. हा सर्व घटनाक्रम साडेबाराच्या सुमारास घडल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे. वाशिममधील बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्याजवळ ही घटना घडल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे.

कालच सोमय्या यांनी ट्विटरवरुन आपण २० ऑगस्ट रोजी शिवसेना खासदार भावना गवळी आणि समूहाचा १०० कोटी रुपयांचा घोटाळा उघड करण्यासाठी तसेच या प्रकरणाचा पाठपुरवठा करण्यासाठी वाशिमला भेट देणार असल्याचं जाहीर केलं होतं. याच भेटीदरम्यान हल्ला करण्यात आल्याचं सोमय्या यांचं म्हणणं आहे. त्यामुळेच त्यांनी ट्विटमध्ये खासदार भावना गवळी आणि १०० कोटींचा घोटाळा या दोन गोष्टींचा उल्लेख केला आहे.

सकाळी वाशिमला पोहचल्यानंतरही सोमय्या यांनी ट्विटरवरुन फोटो पोस्ट केले होते. खासदार भावना गवळी ग्रुपचे १०० कोटींचे घोटाळे, हायवे कंत्राट अडथळे, खासगी कंपन्या, बँका, पोलीस स्थानकाला भेट देणार असल्याचं सोमय्या या ट्विटमध्ये म्हणाले होते. हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला असला तरी या संदर्भात अद्याप शिवसेनेनं कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Tags: kirit somaiyashivsenawashim
Previous Post

चितळे उत्पादन कंपनीच्या नावात होणार बदल; ..असे असेल नवे नाव.!

Next Post

सोमय्यांच्या दगडफेकीवर खा. भावना गवळींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या “सांगितल होतं तरी…!”

Next Post
सोमय्यांच्या दगडफेकीवर खा. भावना गवळींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या “सांगितल होतं तरी…!”

सोमय्यांच्या दगडफेकीवर खा. भावना गवळींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या “सांगितल होतं तरी...!”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!