• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महिला स्वच्छतागृहांसंदर्भात स्थापन समितीची बैठक घ्यावी : वैशाली विसपुते यांची मागणी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 20, 2021
in जळगाव, महानगरपालिका
0
महिला स्वच्छतागृहांसंदर्भात स्थापन समितीची बैठक घ्यावी : वैशाली विसपुते यांची मागणी
Spread the love

 

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा – शहरातील महिला स्वच्छतागृहांच्या मनपा प्रशासनाने स्थापन केलेल्या समितीची गेल्या ५ वर्षापासून एकही बैठक झालेली नाही. शहरात महिला स्वच्छतागृहांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून समितीची बैठक लवकरात लवकर घेण्यात यावी अशी मागणी निधी फाऊंडेशनच्या अध्यक्षा तथा समितीच्या सदस्या वैशाली विसपुते यांनी महापौर जयश्री महाजन यांच्याकडे केली आहे.

निधी फाऊंडेशनतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहरातील महिला स्वच्छतागृहांची दुरवस्था बद्दल मी २०१५ पासून लढा देत आहे. मनपा प्रशासन आणि वेळोवेळी आलेल्या सत्ताधारी प्रतिनिधींकडे पाठपुरावा करून देखील तो विषय आजवर मार्गी लागलेला नाही. महिला स्वच्छतागृहांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देश पारित केले आहेत. जळगाव मनपाला याबाबत वारंवार कळवून देखील त्यांनी त्याचे पालन केलेले नाही. तसेच महिला स्वच्छतागृहांबाबत मनपाने एक समिती २०१६ मध्ये स्थापन केली असून मी देखील त्यात सदस्य आहे. समितीच्या स्थापनेपासून आजवर एकही बैठक घेण्यात आली नाही. शहरात उपलब्ध असलेल्या महिला स्वच्छतागृहांच्या आणि व्यापारी संकुलातील प्रसाधनगृहांच्या बाबतीत मनपा प्रशासन प्रचंड उदासीन आहे. शहर मनपात बसविण्यात आलेल्या सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीनबाबत देखील मनपा प्रशासन निष्काळजीपणा करते. जळगाव शहरातील महिला स्वच्छतागृह, समिती, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन यासह महिलांच्या विविध प्रश्नांना आपण हात घालत ते लवकरात लवकर मार्गी लावावे, अशी विनंती वैशाली विसपुते यांनी महापौर जयश्री महाजन यांच्याकडे केली आहे.

Tags: jalgaonjalgaon visaputenidhi fodeshan
Previous Post

कोरोनाच्या येणाऱ्या संकटावर मत करण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

शायर मूनव्वर राणाचे वादग्रस्त वक्तव्य : जळगावात संतप्त प्रतिक्रिया

Next Post
शायर मूनव्वर राणाचे वादग्रस्त वक्तव्य : जळगावात संतप्त प्रतिक्रिया

शायर मूनव्वर राणाचे वादग्रस्त वक्तव्य : जळगावात संतप्त प्रतिक्रिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!