• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अनाथ बालकांच्या अत्याचाराबाबत चाईल्ड हेल्पलाईनशी संपर्क साधण्याचे आवाहन

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 13, 2021
in क्राईम, महाराष्ट्र
0
Spread the love

(राजमुद्रा जळगाव) कोवीड-19 आजारामुळे दोन्ही पालक गमवावे लागलेल्या बालकांना बेकायदेशीररित्या दत्तक देण्याबाबतचे संदेश समाजमांध्यमावर फिरत आहेत. मात्र हा काही समाज कंटकांकडून अनाथ बालकांच्या असहायतेचा गैरफायदा घेतला जात असून बालकांची विक्री करण्याचा गंभीर प्रकार आहे. त्यावर कायद्यानुसार कठोर कार्यवाही केली जाईल, असा इशारा महिला व बाल विकास विभागाने दिला आहे.

अशा घटना रोखण्यासाठी याबाबतची माहिती मिळाल्यास चाईल्ड लाईन-1098 या हेल्पलाईनशी संपर्क साधावा, अथवा सारा (State Adoption Resource Agency) 8329041531 या क्रमांकावर माहिती द्यावी असे आवाहन विजयसिंग परदेशी, सदस्य सचिव, जिल्हा बाल संरक्षण समिती तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी प्रत्रकान्वये केले आहे.

कोरोना परिस्थितीत इतर अनेक समस्यांबरोबर बालकांच्या समस्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पालकांचे आरोग्य, संरक्षण, बालविवाह यासारख्या समस्येसोबतच कोवीड-19 मुळे दोन्ही पालकांचा मृत्यु झाला असल्यास बालके अनाथ होण्याची गंभीर समस्या होत आहे. अशा बालकांच्या समस्येचा काही सकाजकंटक संधी म्हणुन वापर करुन घेत विक्री करत असल्याचे चित्र समाज माध्यमावरील पोस्टवरुन दिसून येत आहे. यासाठी फेसबुक, व्हास्टॲप, इन्टाग्राम, टिव्टर चा वापर करुन त्यावर विविध भावनात्मक मेसेज टाकले जात असुन बालके दत्तकास उपलब्ध आहेत असे चित्र निर्माण केले जात आहेत. हे समाजकंटक बालकांची विक्री करण्याची शक्यता नाकरता येत नाही. परंतु अशाप्रकारे बालकांना परस्पर दत्तक घेणे, देणे व खरेदी विक्री करणे हा कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे. अशाप्रकारे कृत्य करणारी व्यक्ती भारतीय दंड साहितानुसार कठोर कार्यवाहीस पात्र आहे.

7 मे, 2021 शासन निर्णयानुसार जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली टास्कफोर्स / कृतीदल स्थापन करण्याचे निर्देश प्राप्त झालेले आहे. या टास्कफोर्स / कृतीदलामध्ये सदस्य म्हणून आयुक्त, महानगरपालिका, पोलिस अधिक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, जिल्हा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समन्वयक म्हणुन काम पाहणार असून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हे या टास्क फोर्सचे सदस्य सचिव राहतील, असेही श्री. परदेशी यांनी कळविले आहे.

Tags: child help linejalgaonmaharashtramahila bal kalyan vibhagrajmudravijaysingh pardesi
Previous Post

झोपडपट्टी पुनर्वसन भ्रष्टाचाराची चौकशी करा अन्यथा…

Next Post

घाबरू नका ; जिल्हा रुग्णालयात पुरेसा ऑक्सिजन साठा…

Next Post

घाबरू नका ; जिल्हा रुग्णालयात पुरेसा ऑक्सिजन साठा…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!