• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जामनेर तालुक्यात तातडीने मदतकार्य सुरू करा : पालकमंत्र्यांचे निर्देश

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 7, 2021
in जळगाव, राजकीय
0
Spread the love


चक्रीवादळासह अतिवृष्टीचा फटका : प्रशासनाला तात्काळ कार्यवाहीच्या सूचना

मुंबई / जळगांव दि. ७ (प्रतिनिधी ) जामनेर तालुक्यातील अनेक गावांना काल मध्यरात्रीच्या सुमारास चक्रीवादळासह मुसळधार पावसाने तडाखा दिला असून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाला तातडीने मदतकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. अनेक गावांमध्ये पाणी शिरले असून शासकीय पातळीवर तात्काळ मदत करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या असून ते सातत्याने जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहेत. तहसीलदार अरूण शेवाळे हे आपल्या सहकार्‍यांसह आज पहाटेपासूनच आपत्तीग्रस्त गावांना भेटी देत असून त्यांनी मदतकार्यात सहभाग घेतला आहे.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, काल रात्री जामनेर तालुक्याला अतिवृष्टीने झोडपले आहे. तालुक्यातील अनेक गावात अतिवृष्टी व चक्रीवादळामुळे भागदरा, तोंडापूर व ओझर या गावांमध्ये पावसाचे पाणी घुसले असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने तालुक्यातील ओझर गावामध्ये सोमवार रोजी रात्रीच्या सुमारास चक्रीवादळ अतिवृष्टी झाली. भागदरा या गावातील काही घरांमध्ये पाणी शिरले. तर अनेक शेतातील कपाशी वाहून गेली त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच तोंडापूर या गावामध्ये नदीला पूर आल्यामुळे दोघा गावाचा संपर्क तुटला आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टीच्या पावसामुळे नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने ओझर, तळेगाव, टाकळी आणि तोंडापूर या गावांमध्ये तुलनेत जास्त हानी झाली आहे.

आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे मुंबईत असून त्यांनी या आपत्तीची माहिती मिळताच तात्काळ जिल्हाधिकारी आणि जामनेरच्या तहसीलदारांशी संपर्क साधून मदतकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. तालुक्यात आवश्यकता पडल्यास एसडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या आहेत. पालकमंत्री प्रशासनाच्या संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

दरम्यान, तहसीलदार अरूण शेवाळे हे आपल्या सहकार्‍यांसह आज पहाटेपासूनच आपत्तीग्रस्त गावांना भेटी देत असून त्यांनी मदतकार्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे.

Tags: gulabrao patiljalgaon jilhajamnerjamner puragrast
Previous Post

जळगाव जिल्हा भाजपमध्ये घमासान ; नगराध्यक्षांसह,नगरसेवक,पं.स सदस्य,जी.प सदस्यां सह १३ जनांना बजावली नोटिस…

Next Post

महापूर ; जामनेर तालुक्यातील भागदरा गावाजवळ तलाव फुटला अतिवृष्टीचा फटका

Next Post
महापूर ; जामनेर तालुक्यातील भागदरा गावाजवळ तलाव फुटला अतिवृष्टीचा फटका

महापूर ; जामनेर तालुक्यातील भागदरा गावाजवळ तलाव फुटला अतिवृष्टीचा फटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!