• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पत्रकारांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे आश्वासन

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 13, 2021
in क्राईम, धुळे, राजकीय
0
पत्रकारांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक  गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे आश्वासन
Spread the love

 धुळे राजमुद्रा वृत्तसेवा – पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, राज्यात पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून पत्रकारांची कोंडी  करण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. पत्रकारांवर गुन्हा दाखल करण्यापूर्वी त्याची सत्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत तपासावी यासह काही मागण्यांसाठी अ.भा. मराठी पत्रकार परिषदेच्या शिष्टमंडळाने आज मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले असता चर्चा करतांना ना. दिलीप वळसे पाटील यांनी कारवाई करण्यासह सकारात्मक प्रतिसाद देत परिषदेच्या मागण्यांच्या पुर्ततेसाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावण्यात येईल असे ठोस आश्वासन शिष्टमंडळास दिले.

 

आज मंचर जि. पुणे येथे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष सुनिल लोणकर, परिषदेचे माजी विभागीय चिटणीस डी. के. वळसे पाटील आदींचा समावेश होता.  

 

गृहमंत्र्यांशी चर्चा करताना एस. एम.देशमुख यांनी राज्यात पुन्हा एकदा पत्रकारांवरील हल्ले मोठ्या प्रमाणात वाढल्याचे सांगितले. गेल्या दोन दिवसात मुंबई, चाकुर, श्रीगोंदा आदि ठिकाणी पत्रकारांवर हल्ले झाले आहेत. या प्रकरणातील हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी एस.एम.देशमुख यांनी केली. एक सत्य बातमी दिल्यामुळे केज येथील पत्रकारांवर खोटा गुन्हा दाखल केल्याचे देशमुख यांनी वळसे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. पत्रकारांवर गुन्हा दाखल करण्यापुर्वी त्याची सत्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत तपासून पहावी अशी मागणी देखील शिष्टमंडळाने केली.  पत्रकारांचे पेन्शन, आणि प्रश्न प्रलंबित आहेत. पत्रकारांना कोरोना फ्रन्टलाईन वर्कर म्हणून जाहीर करावे आणि ज्या १५५ पत्रकारांचे कोरोनानं निधन झालं आहे अशा सर्व पत्रकारांच्या नातेवाईकांना १० लाख रूपयांचे अनुदान द्यावे आदि मागण्या सातत्यानं सरकारकडे केल्या जात आहेत. परंतू यासंबंधी कोणताच निर्णय होत नसल्याने आपण पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावावी अशी विनंती वळसे पाटील यांच्याकडे केली असता, मुख्यमंत्र्यांशी बोलून अशी बैठक लावण्याचे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळास दिले.  जवळपास अर्धा तास ही बैठक झाली.

 

Tags: dhulhe jalgaondilip valhse patilmaharashtra patrakarmumbai
Previous Post

साकीनाका घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या ; महिला सुरक्षा संघटनेकेली मागणी..

Next Post

अग्रसेन नागरी पतसंस्थेच्या ठेवीदारांना ठेवीची रक्कम मिळवून देणार- वाल्मिक दामोदर

Next Post
अग्रसेन नागरी पतसंस्थेच्या ठेवीदारांना ठेवीची रक्कम मिळवून देणार- वाल्मिक दामोदर

अग्रसेन नागरी पतसंस्थेच्या ठेवीदारांना ठेवीची रक्कम मिळवून देणार- वाल्मिक दामोदर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!