• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या विद्यार्थिनींनीचा वेबिनार मध्ये उदंड सहभाग .

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 27, 2021
in जळगाव, शैक्षणिक
0
सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या विद्यार्थिनींनीचा वेबिनार मध्ये उदंड सहभाग .
Spread the love

मुंबईच्या दत्ता मेघे इंजीनियरिंग कॉलेज मुंबईचा स्तुत्य उपक्रम .

जामनेर राजमुद्रा वृत्तसेवा ।  जागतिक कन्या दिनानिमित्त नवी मुंबई येथील दत्ता मेघे इंजिनिअरिंग कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित महिला सशक्तिकरण ऑनलाइन वेबिनारमध्ये पहूर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला .

जागतिक कन्या दिनाच्या पार्श्वभूमीवर काल शनिवार दिनांक २५ सप्टेंबर २०२१ गुगल मीटद्वारे नवी मुंबई येथील दत्ता मेघे इंगिनीरिंग कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन वेबिनारचे उद्घाटन सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली घोंगडे यांच्या हस्ते झाले . राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा .नितीन देशमुख यांनी मार्गदर्शन केले .किशोरवयीन मुलींमध्ये वाढत्या वयात होणारे शारीरिक , मानसिक ,भावनिक बदल, मासिक जागृकता,सेल्फ डिफेन्स या विषयांवर स्वयंसेविका निर्मीती भोईर , अनुश्री डोंगरे , पुजा गोसावी ,श्रेया कानसे, सेजल मोरे, समिधा गावलकर , नंदिनी शेळके ,प्रज्वल पाटील ,साक्षी धनवडे , सृष्टी म्हात्रे , श्वेता दर्वे , स्नेहल लवंगरे , सिद्धीका पाटील , मृण्मयी जकाते , सुकन्या मंडल , आरूषी दास यांनी मार्गदर्शन करून विद्यार्थीनींच्या शंकांचे निरसन केले . इ. ७ वी ते १० वीच्या सुमारे १०० विद्यार्थिनी वेबिनार मध्ये सहभागी झाल्या होत्या .यशस्वीतेसाठी स्वयंसेवक दीपक पवार , विशाल बागवे , आदित्य पुजारी , राज जाधव , निखिल माळी , चिराग महाजन यांचे सहकार्य लाभले .

महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबुराव अण्णा घोंगडे यांनी दत्ता मेघे इंजीनियरिंग कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या .मुलींनी शिक्षण घेऊन स्वतः च्या पायावर उभे राहून स्वावलंबी जीवन जगावे . स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी . प्रसंगी धीरोदात्तपणे आलेल्या प्रसंगाला सामोरे जावे असे आवाहनही त्यांनी केले . याप्रसंगी शिक्षीका कल्पना बनकर ,माधुरी बारी , अश्विनी पाटील , सोनाली शेकोकारे यांची उपस्थिती होती .या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थिनींना ऑनलाइन पद्धतीने मौलिक मार्गदर्शन लाभले . समन्वयक म्हणून ELC क्लबचे अध्यक्ष शंकर भामेरे यांनी काम पाहिले .

Tags: jalgaon jilhajamner
Previous Post

तर राजसाहेबानी, भाजपशी युती करावी, निवडणुकीत फायदा होईल, या मनसे नेत्यांनी केली मागणी

Next Post

जळगावात ‘मोदी हटाव, देश बचाव’ चा नारा देत.. राष्ट्रवादी,कॉग्रेसचे नेते रस्त्यावर

Next Post
जळगावात  ‘मोदी हटाव, देश बचाव’ चा नारा देत..  राष्ट्रवादी,कॉग्रेसचे नेते रस्त्यावर

जळगावात 'मोदी हटाव, देश बचाव’ चा नारा देत.. राष्ट्रवादी,कॉग्रेसचे नेते रस्त्यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!