• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 30, 2021
in राजकीय
0
आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल…
Spread the love

सोलापूर राजमुद्रा वृत्तसेवा । काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आमदार शिंदे यांच्याविरुद्ध सोलापुरातल्या सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  केंद्र सरकारच्या विरोधात विनापरवाना आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील, शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्यावरही गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात इंधन आणि गॅस सिलेंडर सह जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीवरून केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले होते. मात्र आंदोलनाला परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, दहा दिवसापूर्वी सोलापुरात काँग्रेसचा मेळावा पार पडला होता. यावेळी राज्यमंत्री आणि काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाबाबत भाष्य केले होते. यावेळी बोलताना विश्वजीत कदम म्हणाले, “आमदार प्रणिती शिंदे आमच्यासोबत मंत्रिमंडळात नाहीत याची खंत वाटते. मात्र कदाचित लवकरच प्रणिती शिंदे या राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्रीच नव्हे तर कॅबिनेट मंत्री होतील”. त्यामुळे सोलापुरात आढावा बैठकीसाठी आलेले कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी संघटनेतील कार्यकर्त्यांनाही चार्ज केल्याची चर्चा पाहायला मिळाली.

सोलापूर शहर उत्तरमध्ये विकासाच्या नावाने बोंब असून, सोलापूर महापालिकेत गेल्या चार वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. चार वर्षांपासून अनागोंदी कारभार सुरू आहे, असा हल्लाबोल प्रणिती शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. भ्रष्टाचार, अपुरा आणि आठ दिवसाआड पाणी पुरवठा, चुकीच्या पद्धतीने होत असलेली कामे, मोदी सरकारकडून रोजच होत आलेली पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, खाद्य तेलाचे दरवाढ, प्रचंड महागाई, कॉंग्रेस पक्षाने कोव्हिड काळात केलेली कामे हे सर्व जनतेपर्यंत पोहोचवून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडून शहर उत्तर मध्ये संघटना मजबूत करण्याचे आवाहन काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केलं होतं.

 

 

Tags: praniti shinde
Previous Post

शेतकऱ्यांची आत्महत्या वाढण्याची भीती – विजय वडेट्टीवार

Next Post

जिल्हा बँकेत रिपाईला एक जागा हवी – रवींद्र सपकाळे

Next Post
जिल्हा बँकेत रिपाईला एक जागा हवी – रवींद्र सपकाळे

जिल्हा बँकेत रिपाईला एक जागा हवी - रवींद्र सपकाळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!