• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेतंर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 20 लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 1, 2021
in जळगाव
0
राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेतंर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 20 लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत जळगांव तालुक्यातील 20 लाभार्थ्यांना प्रत्येकी 20 हजार याप्रमाणे 4 लाख रुपयांच्या मदतीच्या धनादेशाचे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात वाटप करण्यात आले.

राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेतंर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील 18 ते 59 वर्षे वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटूंबियांना 20 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते. त्यानुसार आज तालुक्यातील 20 लाभार्थ्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये याप्रमाणे एकूण 4 लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. या अर्थसहाय्यातून मुलांच्या शैक्षणिक व आवश्यक बाबींवर खर्च करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी लाभार्थ्यांना केले.

दापोरा येथील श्रीमती जया ठाकरे, अनुसया तांदळे, देवकाबाई पाटील, भागवत सोनवणे, सुमनबाई तांदळे, जळके येथील श्रीमती सीमा जाधव, शिरसोली येथील श्रीमती वंदनाबाई भोई, कानळदा येथील श्री विष्णू बाविस्कर,  श्रीमती सिंधू नन्नवरे, उषाबाई सपकाळे,  इंद्रायणी सोनवणे,  नलिनी गायकवाड,  नशिराबाद येथील श्रीमती अख्तरजहाँ मन्यार, धानवड येथील श्रीमती पिंकीबाई राठोड, फुपनी येथील श्रीमती कमलाबाई सैंदाणे, विदगाव येथील आशाबाई कोळी, तरसोद येथील सुनंदाबाई थोरात, धामणगाव येथील अन्नपूर्णा बाविस्कर,  सुलभा सपकाळे आदि लाभार्भ्यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी तहसीलदार नामदेव पाटील, जिलहा परिषद सदस्य पवन सोनवणे, जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, महानगर प्रमुख शरद तायडे, शिवराज पाटील, माजी सभापती नंदलाल पाटील, जनाआप्पा पाटील (कोळी), फुपनीचे माजी सरपंच डॉ. कमलाकर पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे जळगाव ग्रामीणचे तालुका अध्यक्ष रमेशआप्पा पाटील, गजानन मालपुरे, प्रमोद सोनवणे, पंकज पाटील, प्रविण पाटील, उमाजी पानगळे व सचिन चौधरी, अव्वल कारकून अर्चना पवार, ज्योती चौधरी यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.  तहसीलदार नामदेव पाटील यांनी प्रास्ताविकात या योजनेसंदर्भात सविस्तर दिली विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष रमेशअप्पा पाटील यांनी केले तर आभार अव्वल कारकून के आर तडवी यांनी मानले.

 

Previous Post

विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अजित पवार यांचे आश्वासन…

Next Post

एकनाथराव खडसे म्हणतात…यामुळे लावली चौकशी

Next Post
एकनाथराव खडसे म्हणतात…यामुळे लावली चौकशी

एकनाथराव खडसे म्हणतात...यामुळे लावली चौकशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!