• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पवार-गडकरींमध्ये चर्चा ; पुणे विमानतळाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार !

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 2, 2021
in राजकीय
0
पवार-गडकरींमध्ये चर्चा ; पुणे विमानतळाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार !
Spread the love

पुणे राजमुद्रा वृत्तसेवा । देशाच्या राजकारणातील दोन दिग्गज नेत्यांची आज पुण्यात भेट झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यात पुण्यात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पुणे विमानतळाचा प्रश्न आता लवकर मार्गी लागण्याची शक्यता आहे. तशी माहितीच भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी दिलीय. तसंच आपण एक पत्र नितीन गडकरी यांना दिल्याचंही बापट यांनी यावेळी सांगितलं.

शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्यात मुंबई-गोवा महामार्गाबाबतही चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी दिलीय. मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न लवकरच निकाली लागेल, असं तटकरे म्हणाले. तसंच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाही अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती आल्या होत्या. मात्र, त्यांनाही अशी मदत करता आली आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं निकष बदलून मदत करावी, अशी मागणी तटकरे यांनी केली आहे. त्याचबरोबर राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार हे किवळ राजकीय भाष्य आहे, यामध्ये फारसं तथ्य नाही, असा दावाही तटकरे यांनी यावेळी केलाय.

पुणे येथे विमान प्रवास वाहतुक सातत्याने वाढत आहे . त्यामुळे सध्या असलेल्या इमारतीत प्रवाशांची मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी पुणे विमानतळ प्राधिकरणाने 5 लाख चौरस फुटापेक्षा जास्त क्षेत्रफळ आणि अत्याधुनिक सोयीसुविधा असलेलं इंटिग्रेटेड टर्मिनल बांधण्यात येणार आहे. या टर्मिनलमध्ये दरवर्षी 1 कोटी 90 लाख प्रवाशांना सामावून घेण्याची क्षमता असणार आहे. नव्या टर्मिनलचं 61 टक्के काम पूर्ण झालं असून 2022 पर्यंत ते वापरासाठी खुलं होईल, अशी माहिती दिली आहे. पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांच्या उपस्थितीत 30 ऑगस्ट रोजी विमानतळ प्राधिकरणाची बैठक पार पडली होती. त्यावेळी त्यांनी विमानतळ विस्तारीकरणाबाबत आढावा घेतला.

 

 

Tags: nitin gadkarisharad pawar
Previous Post

सोमय्या यांच्या आरोपाने खळबळ….

Next Post

बाबांनो कोर्टाची पायरी चढू नका, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सल्ला

Next Post
बाबांनो कोर्टाची पायरी चढू नका, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सल्ला

बाबांनो कोर्टाची पायरी चढू नका, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!