बारामती राजमुद्रा वृत्तसेवा । “सद्यस्थितीत जमीन ही घराघरातील वादाचे मूळ आहे. हे वाद कायमस्वरुपी मिटावेत अशी आमची भूमिका आहे. बाबांनो कोर्टाची पायरी चढू नका” असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. बारामतीत डिजीटल स्वाक्षरीत सातबारा वाटप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
आमच्या लहानपणी तलाठी अर्थात भाऊसाहेबांचाच थाट असायचा. त्याकाळी काहींनी कुणाच्याही जमिनी कुणाच्याही नावावर करण्याचे उद्योग केल्याचा किस्सा यावेळी अजित पवार यांनी सांगितला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार वक्तशीरपणासाठी ओळखले जातात. त्यांच्या अचूक वेळेचा अंदाज शिरुरकरांना अनुभवायला मिळाला. शिरुर नगर परिषदेच्या नुतन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम काल 1 ऑक्टोबरला अजित पवार यांच्या हस्ते आज सकाळी पार पडला. उद्घाटनाची वेळ सकाळी 7 वाजताची असताना अजित पवारांनी बरोबर 6.59 ला फीत कापली…! उद्घाटनाची वेळ सकाळी 7 वाजताची ठरलेली होती. पण अजित पवारांचं 6. 50 वाजताच कार्यक्रमस्थळी आगमन झालं. शिरूर नगरपरिषदेच्या वतीने अजित पवार यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं आणि पुढच्या 10 मिनिटांमध्ये इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.