• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लालबहादूर शास्त्री, म. गांधींना जयंतीनिमित्त अभिवादन ; जळगावात विविध उपक्रमांचे आयोजन

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 2, 2021
in जळगाव, महानगरपालिका
0
लालबहादूर शास्त्री, म. गांधींना जयंतीनिमित्त अभिवादन ; जळगावात विविध उपक्रमांचे आयोजन
Spread the love

 जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । ‘जय जवान, जय किसान’चा मंत्र देणारे भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास तसेच प्रतिमेस माल्यार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. शहरातील विविध कार्यक्रम, उपक्रमांतर्गत महापौर जयश्री सुनिल महाजन यांनी अभिवादन केले.

याप्रसंगी महापालिकेसह शहरात आजादी का अमृत महोत्सवांतर्गत स्वच्छता अभियान, महापालिका अधिकारी, कर्मचार्‍यांचा सत्कार, ‘कोविड-19’अंतर्गत महापालिका अधिकारी, कर्मचार्‍यांचे लसीकरण, जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे शहरात काढण्यात आलेली रॅली आदी कार्यक्रम झाले.

जळगाव शहरातील टॉवर चौकात असलेल्या लालबहादूर शास्त्री यांच्या पुतळ्यास सकाळी साडेनऊच्या सुमारास महापौर जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते माल्यार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. महापालिका प्रभाग अधिकारी राजेंद्र पाटील, महापौरांचे स्वीय सहाय्यक नितीन पटवे, कोल्हे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

महात्मा गांधी उद्यानातील महात्मा गांधींच्या पुतळ्यास सकाळी दहाच्या सुमारास महापौर जयश्री सुनिल महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला यावेळी महापालिका प्रभाग अधिकारी राजेंद्र पाटील, महापौरांचे स्वीय सहाय्यक नितीन पटवे, कोल्हे, योगेश वाणी आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, भारत सरकार व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशान्वये जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या आदेशान्वये आज शनिवार, दि.2 ऑक्टोबरपासून 14 नोव्हेंबर 2021 दरम्यान पॅन इंडिया आऊटरीच प्रोग्रॅमचे रॅलीद्वारे उद्घाटन करण्यात आले. संबंधित रॅलीला जिल्हा व सत्र न्यायालय जळगाव येथून सकाळी सव्वादहाच्या सुमारास सुरूवात होऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी उद्यानात समारोप करण्यात आला. याप्रसंगी उद्यानातील गांधीजींच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादनही करण्यात आले. याप्रसंगी महापौर जयश्री सुनिल महाजन, प्रभारी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.ए. देशपांडे, जिल्हा सत्र न्यायाधीश .एस.जी.ठुबे, आर. एन. हिवसे,  डी.ए. काळे, व्ही.बी. बोहरा, दिवाणी न्यायाधीश वंदना जोशी, एस.पी.सय्यद, जे.बी.पवार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ए.ए.के. शेख, जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष व सचिव, एस.एस.मणियार लॉ कॉलेज व गोदावरी लॉ कॉलेजचे प्राचार्य, शिक्षक वृंद व विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या निर्देशानुसार जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे  महात्मा गांधी जयंतीनिमित्त ‘आजादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये महापौर जयश्री सुनिल महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी, उपायुक्त श्याम गोसावी, पवन पाटील यांच्या हस्ते महापालिकेतील दुसर्‍या मजल्यावरील सभागृहात सकाळी साडेदहाच्या सुमारास निवडक 25 सफाई कर्मचार्‍यांचा तसेच अधिकाऱ्यांचाही “सफाईमित्र” म्हणून सन्मान करण्यात आला. तसेच ‘महापौर सेवा कक्षा’तर्फे शहरातील नागरिकांच्या स्वच्छतेसह विविध तक्रार निवारण करण्याच्या उत्कृष्ट कार्याबद्दल महापौर जयश्री सुनिल महाजन यांचा महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.

 

Tags: mahanagarpalika
Previous Post

व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर रामदास कदम यांची प्रतिक्रिया, ते पाप माझ्या हातून होणार नाही….

Next Post

भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर तर्फे गांधी जयंती निमित्त नगर पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा “स्वच्छता दूत” म्हणून सन्मान

Next Post

भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर तर्फे गांधी जयंती निमित्त नगर पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा "स्वच्छता दूत" म्हणून सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!