• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मनसेचे पालिकेसमोर समोर ‘झोपा काढा’ आंदोलन

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 4, 2021
in जळगाव, महानगरपालिका
0
मनसेचे पालिकेसमोर समोर ‘झोपा काढा’ आंदोलन
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । जळगांव शहरामध्ये जवळपास दोन ते तीन वर्षापासून रस्त्यांचे तसेच भूमिगत गटारीचे काम सुरु आहे. त्यामुळे संपूर्ण शहरातील रस्त्यांची पूर्णत: वाताहात झालेली आहे. त्यातच ऐन पावसाच्या दिवसामध्ये तर जनतेला खराब रस्त्यांमुळे नरक यातना सहन कराव्या लागत आहेत. याबाबत आम्ही आपणांकडे निवेदने दिले असता तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वेळोवेळी आंदोलने करून सुध्दा हे प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे. त्या प्रशासनाला उठविण्यासाठी मनपा इमारतीत ‘झोपा काढू’ आंदोलन मनसे जिल्हा सचिव ॲड.जमिल देशपांडे, मनविसे जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे, जिल्हा संघटक राजेंद्र निकम यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

निवेदनात असे म्हटले आहे की, आपणांकडून आम्हांस सांगण्यात येते की, सद्यस्थितीत म.न.पा.जवळ पैसा नसल्यामुळे रस्त्यांची कामे पूर्ण होऊच शकत नाही, तसेच जी काही वसूलीची रक्कम येते ती रक्कम अमृत योजनेसाठी वापरली जाते, त्यामुळे आमचा नाईलाज झालेला आहे असे उत्तरे आयुक्त साहेबांकडून आम्हांस मिळत आहेत. महोदय, साहेब आपणांकडून अशा उत्तराची आम्हांस आता अपेक्षा नसून आपणाकडे जर रस्त्यांच्या कामासाठी पैसे नसतील तर आपण सुध्दा ऑफीसला का येत असतात ?
सदरील जळगांव शहरातील रस्त्यांची कामे ज्या संबंधित ठेकेदार/ इंजिनिअर्स यांना दिलेले असले त्यांचा आमच्याशी प्रत्यक्ष संपर्क करुन द्यावा अथवा त्यांचा मोबाईल नंबर आम्हांस द्यावा म्हणजे आम्हा आता त्यांनाच याबाबत जाब विचारणार आहोत. तरी महोदय साहेब आपणास आता आमची हात जोडून नम्र विनंती की, जळगांव शहरातील संपूर्ण रस्त्यांच्या कामांना 10 दिवसाचे आत सुरुवात करावी. असे निवेदन देण्यात आले.
यावेळी जनहित शहर अध्यक्ष संदिप मांडोळे, मनविसे शहराध्यक्ष योगेश पाटील, संदीप महाले, जळगाव शहर संघटक निलेश अजमेरा, तालुका संघटक राजू बाविस्कर, महेश माळी, जळगाव तालुका संघटक गणेश नेरकर, कुणाल पाटील, कुणाल पवार, गोविंद जाधव,विशाल कुमावत, संतोष सुरवाडे, रमेश भोई, मनोज खुळे, निलेश खैरनार, अँड.दिनेश चव्हाण, मंगेश भावे, सिध्देस कवठाळकर, गोरख गायकवाड, संदिप पाटील आदी उपस्थित होते.

Previous Post

मंत्री जयंत पाटील यांची घोषणा ; अपूर्ण सिंचन प्रकल्पांना निधी देणार

Next Post

अजित पवारांनी दिला अल्टी मेटम…

Next Post
अजित पवारांनी दिला अल्टी मेटम…

अजित पवारांनी दिला अल्टी मेटम...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!