मुंबई राजमृद्रा वृत्तसेवा । भोसरी भूखंड प्रकरणत अटक करण्यात आलेले तत्कालीन उपनिरबंधक रवींद्र मुळे यांना कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला असून दुसरीकडे ईडीने दाख्ल केलेल्या चार्जशीटच्या आधरे पीएमएलए कोर्टाने माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि मंदाताई खडसे यांना उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावले आहे. भोसरी येथील वादग्रस्त भूखंड खरेदी प्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे जवाई गिरीश चौधरी यांच्या पाठोपाठ या व्यवहारात महत्वाची भूमीका असणारे तत्कालीन उपनिबंधक रवींद्र मुळे यांना देखील गेल्या आठवडयात अटक करण्यात आली होती. पीएमएलएच्या विशेष न्यायालयाने मूळेंना दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
उपनिबंध्क रवींद्र मुळे यांनी भोसरी येथील जमिनीचे बाजारमुल्य हे 23 कोटी रूपये असतांना खडसे यांच्या आप्तांसाठी याचे मूल्य 2.7 कोटी रुपये इतके केले. यातून गैरव्यवहार झाल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. तर एकनाथराव खडसे यांनी या सौद्यात आपल्याकडील 50 लाख रुपये मंदाताई खडसे यांच्या खात्यामध्ये वळविले आहेत. यात 15 लाख रूपये रोकडच्या स्वरूपात भरण्यात आले होते. यातील 38 लाख रुपये भोसरी येथील भूखंडाची खरेदी करण्यात आल्याचे ईडीने आपल्या आरोपपत्रात नमूद केले आहे. रवींद्र मूळे यांनी पीएमएलए कोर्टात जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. यावर सोमवारी सुनावणी करण्यात आली. यात मुळे यांचे वकील मोहन टेकावडे यांनी रवींद्र मुळे हे या प्रकरणातील थेट लाभार्थी नसून ते चौकश्ीत सहकार्य करत असल्याची बाब न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. यामूळे त्यांना ईडीला चौकशीत सहकार्य करावे, अशी अट टाकण्यात आली आहे. याप्रकरणी सोमवारी झालेल्या सुनावणीत पीएमएलए न्यायालयाने माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांना कोर्टासमोर हजर होण्यासाठी समन्स बजावले आहे. यानुसार त्यांना गुरुवारच्या आधी न्यायालयासमोर हजर व्हावे लागणार आहे.