• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात महाआरोग्य शिबिरात ५५ रुग्णांची नोंदणी…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 7, 2021
in जळगाव
0
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात महाआरोग्य शिबिरात ५५ रुग्णांची नोंदणी…
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातर्फे दि. ६ ते ९ ऑक्टोंबर मोफत शस्त्रक्रिया व महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले असून आजपासून शिबिरास प्रारंभ झाला. यात पहिल्याच दिवशी ५५ रुग्णांची नोंदणी करण्यात आली. येत्या ८ ऑक्टोंबरपर्यंत रुग्णांची नावनोंदणी केली जाणार असून ९ ऑक्टोंबरपासून शस्त्रक्रियांना सुरुवात होईल. शिबिरात एमडी मेडिसीन व एमसीएच तज्ञांकडून तपासणी केली जात असून शस्त्रक्रियाही केल्या जाणार आहे.

गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातर्फे गरजु रूग्णांसाठी गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ.वर्षा पाटील यांच्या ९ ऑक्टोबर या वाढदिवसानिमित्‍त ६ ते ९ ऑक्टोंबर हे चार दिवस मोफत तपासणी व शस्त्रक्रिया महाशिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी रुग्णांनी सकाळपासून रुग्णालयात गर्दी करण्यास सुरुवात केली होती. यावेळी रुग्णालय प्रशासनाने कोविड नियमांचे पालन करा, अशा सुचना केल्या व सोशल डिस्ट्न्ससिंग पाळले जावे यासाठीही उपाययोजना केल्यात. रुग्णांच्या नोंदणीस सकाळपासून प्रारंभ झाला असून यात पहिल्याच दिवशी ५५ रुग्णांची नोंदणी करण्यात आली. डॉ.वर्षा पाटील यांचा वाढदिवसानिमित्‍ताने हे शिबिर घेतले जात असून ८ ऑक्टोंबरपर्यंत रुग्णांची नोंदणी केली जाणार असून ९ ऑक्टोंबरपासून मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहे. तरी रुग्णांनी या महाशिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.उल्हास पाटील रुग्णालय प्रशासनाने केले आहे.

या महाशिबीरात मुतखडा, नाक-कान-घसा शस्त्रक्रिया, कॅन्सरच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मोफत केल्या जात आहे. तसेच जनरल मेडीसीन महाआरोग्य शिबीरात किडनीचे आजार, ब्रेन हॅमरेज, मेंदूज्वर, फुफ्फुसाचे आजार, न्युमोनिया, दमा, क्षयरोग, विषबाधा, लिव्हर, मलेरीया, मोफत डायलेसीसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच मेडीसीन शिबीरात ब्रेम हॅमरेजशी संबंधीत उपचारासाठी रूग्णालयात भरती झालेल्या रूग्णांची एमआरआय तपासणी सवलतीत केली जात आहे. या महाशिबीरात एमसीएच तज्ञ डॉक्टरांकडुन रूग्णांची तपासणी देखील मोफत केली जात आहे. हे शिबीर येत्या ८ आक्टोंबर पर्यंतच राहणार असून शस्त्रक्रिया ९ ऑक्टोबरपासून सुरु होतील. महाशिबीरासाठी विभागनिहाय स्वतंत्र टिम कार्यरत करण्यात आल्या आहेत. रूग्णांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली आहे.

Previous Post

सप्तश्रृंगी गडाचे दार भाविकांसाठी खुले; जाणून घ्या नियम अन् कुठे मिळेल पास?

Next Post

मंदिरे उघडली, भाविकांचा जल्लोष…..

Next Post
मंदिरे उघडली, भाविकांचा जल्लोष…..

मंदिरे उघडली, भाविकांचा जल्लोष.....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!