• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते विकासकामांचे लोकार्पण व भूमिपुजन

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 11, 2021
in जळगाव
0
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते विकासकामांचे लोकार्पण व भूमिपुजन
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण । आमदारकीपेक्षाही गावाचे सरपंचपद मिळविणे हे कठीण असते. ही जबाबदारी समर्थपणे पार पाडण्यासाठी प्रत्येकाला गावाचा अभिमान असावा, आणि विकासाचे व्हिजन असावे असे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. तालुक्यातील अनोरे येथे विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपुजन करतांना ते बोलत होते. अनोरे परिसरासाठी ५ केव्हीएचा ट्रान्सफार्मर, गावासाठी स्मशानभूमि, व्यायामशाळा आणि पाण्याची टाकी उभारण्यात येणार असल्याचे देखील पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती प्रेमराज पाटील हे होते.

ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते अनोरे येथे विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमीपुजनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती प्रेमराज पाटील, सरपंच स्वप्नील महाजन, उपसरपंच रूपाली पाटील, अशोक महाजन, रमेश महाजन, मिलींद पाटील, मोतीआप्पा पाटील, डी.ओ. पाटील, पी.एम. पाटील , राजेंद्र महाजन, मोहन महाजन, दामूअण्णा पाटील, विलास महाजन, संजय चौधरी, प्रशांत देशमुख, ग्रामपंचायत सदस्या सौ. कल्पना कापडणे, मनीषा महाजन, ऍड. शरद माळी, संजय चौधरी, हेमंत चौधरी, भानुदास पाटील यांच्यासह अनोरे – धानोरे, गारखेडा – बाभळे परिसरातील सरपंच, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

या कार्यक्रमात ना. गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून अनोरे येथील विकासकामांना प्रचंड प्रमाणात गती मिळाल्याने त्यांना ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि शाळा समितीच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.  याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते साई बाबा मंदिर ते अनोरे रस्ता रूंदीकरण व डांबरीकरण करणे (७५ लक्ष); पेव्हर ब्लॉक-(५ लक्ष) या कामांचे लोकार्पण करण्यात आले. तर शासकीय दराने जमीन खरेदी करून स्मशानभूमि उभारण्याच्या कामाचे भूमिपुजन करण्यात  आले. तर याच कार्यक्रमात शासकीय भावाने स्मशानभूमिसाठी जागा दिल्याबद्दल प्रल्हाद चिंधू महाजन यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते भगवान महाजन यांनी केले. सरपंच स्वप्नील महाजन यांनी गावाच्या विकासासाठी ना. गुलाबराव पाटील यांनी भरभरून निधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. तर उर्वरित कामांसाठी सुध्दा निधी मिळावा यासाठी साकडे घातले. यासोबत गावाचे रशिवासीं अभियंता मिलींद पाटील आणि पी.एम. पाटील सर यांनी सुध्दा मनोगत व्यक्त केले.

ते म्हणाले की, या परिसरात सिंचनाची सुविधा करण्यात आली असून रस्त्यांचे जाळे विणण्यात आले आहे. सेवा ही खरी श्रीमंती असून प्रत्येकाने वडाच्या झाड्याच्या पारंब्यांप्रमाणे जमिनीशी जुडलेले असावे असा सल्ला त्यांनी दिला. माझ्याकडे जिल्ह्यालाच नव्हे तर राज्याची तहान भागविण्याचे काम दिले असून आपण ते चोखपणे बजावत असल्याचे पालकमंत्र्यांनी नमूद केले.

 

Previous Post

विश्वातील एकमेव श्री भूमातेचे मंदिर जळगाव जिल्ह्यात ; कुठे आहे जाणून घ्या..

Next Post

मूलभूत सुविधांच्या नावाने पालिकेची बोंबाबोभ, मात्र करवाढ कशी लादली जाते?

Next Post
मूलभूत सुविधांच्या नावाने पालिकेची बोंबाबोभ, मात्र करवाढ कशी लादली जाते?

मूलभूत सुविधांच्या नावाने पालिकेची बोंबाबोभ, मात्र करवाढ कशी लादली जाते?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!