• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘तुम्ही आदेश द्यायचा आणि मीच झेलायचा हे आपलं नातं’- पंकजा मुंडे

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 13, 2021
in Uncategorized
0
‘तुम्ही आदेश द्यायचा आणि मीच झेलायचा हे आपलं नातं’- पंकजा मुंडे
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण । दोन वर्षानंतर बीडमध्ये भगवान गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याला भाजप नेत्या पंकजा मुंडे संबोधित करणार आहेत. या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. स्वत: खासदार प्रीतम मुंडे यांनी या मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर पंकजा मुंडे यांनीही एक व्हिडीओ ट्विट करून समर्थकांना भगवानगडावर दसरा मेळाव्यासाठी येण्याचं आवाहन केलं आहे. हो… तुम्ही सांगायचे मी करायचे, आपला दसरा आपली परंपरा!!, असं पंकजा मुंडे यांनी सांगितले.

तुमचा आदेश आला… ताई मेळावा झालाच पाहिजे… मेळावा झालाच पाहिजे… तुमचा आदेश आला… ताई संघर्ष केलाच पाहिजे… संघर्ष केलाच पाहिजे… मी संघर्ष केला. तुमचा आदेश आला वाडी वस्त्यावरच्या रस्त्यावरचं काय?…. वाडी वस्त्यावर रस्ते पोहोचले… तुमचा आदेश आला शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं त्याचं काय?… शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये विमा पोहोचला, अनुदान पोहोचलं. तुमचा आदेश आला मुलींचा जन्मदर घटतोय त्याचं काय?… बेटी बचाव, बेटी पढावमध्ये मुलींचा जन्मदर वाढवण्याचं काम सुरू आहे. तुमचा आदेश आला आणि ऊस तोडण्याच्या कोत्याला मान देण्याचा प्रयत्न केला गेला… तुमच्या आदेशासाठी अनेकवेळा मी मान खाली घातली आणि तो आदेश ऐकला… पण तुमची मान कधी खाली जाऊ दिली नाही. मी सत्तेच्या मंचावर असेल नाही तर विरोधात असेल, तुम्ही माझ्यावर कधी माया पातळ केली नाही. तुम्ही म्हणालात त्या प्रत्येक लढ्यात तुमच्यासमोर उभे राहिले, कारण माझ्यामागे तुम्ही होतात… आपलं नातंच असं आहे. तुम्ही सांगायचं आणि मी करायचं. आताही तुम्हीही म्हणालात ताई आपली परंपरा जपली पाहिजे. भगवानबाबांच्या भक्तीची आणि मुंडे साहेबांच्या शक्तीची परंपरा… मुंडे साहेबांना दर दसऱ्याला कधी मुंबई तर कधी दिल्ली दिसायची. मला मात्र दसऱ्याला भव्य जनसागरामध्ये केवळ अन् केवळ भगवानबाबांचे आशीर्वाद आणि मुंडे साहेबांची मूर्ती दिसते. आताही तुम्ही सांगितलं मेळावा झाला पाहिजे आणि 15 ऑक्टोबरला भगवान बाबांची भक्ती आणि मुंडे साहेबांची शक्ती या परंपरेसाठी मी येत आहे सावरगाव भगवान भक्ती गड येथे. आपल्या सर्वांची मी वाट पाहत आहे,’ असं भावनिक आवाहन पंकजा यांनी या व्हिडीओतून केलं आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा भगवान भक्तीगडावरील 12 एकर परिसरात होणार आहे. मेळाव्याआधी गड परिसरातील डागडूजी आणि इतर कामांनी वेग घेतला आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे संत भगवान बाबांच्या भव्य मूर्तीच्या खाली असलेल्या गर्भगृहात पाणी साचले होते, तेही बाहेर काढण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी पाणी साचणारच नाही अशी कायमस्वरुपी व्यवस्था करण्यात आली आहे. हा परिसर वॉटर प्रुफ करण्यात येत आहे. मेळाव्यास राज्याच्या कानाकोपर्‍यातून तसेच बाहेरूनही मोठ्या संख्येने भाविक येतात, त्यांची गैरसोय होऊ नये याची खबरदारी घेण्यात येत आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत हा मेळावा पार पडणार आहे.

दसरा मेळावा आमची परंपरा आहे. यावर्षी मंदिर खुली झाली आहेत. यावर्षी दसरा मेळावा होणार आहे. दसरा मेळावा हा कार्यक्रम राजकीय नाही. अनेक जण सहभागी होतात. अनेक लोक सहभागी होतात. नेता असो की कार्यकर्ता सर्व सहभागी होतात, असं सांगतानाच मी काय बोलेन ते दसरा मेळाव्यात नक्की ऐकायला या. लोकांच्या उत्साहासाठी हा मेळावा होतो, काय बोलायचं ते उत्स्फूर्त बोलेन, असं पंकजा यांनी काल सांगितलं होतं. दसऱ्याच्या आधी नुकसान भरपाईची घोषणा केली तर शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

 

Tags: pankaja munde
Previous Post

पवारांना आता कुणीच वाचवू शकणार नाही, किरीट सोमय्या यांचा अजित पवारांवर हल्लाबोल….

Next Post

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जोरदार प्रत्युत्तर….

Next Post
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जोरदार प्रत्युत्तर….

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जोरदार प्रत्युत्तर....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!