• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एम्फोटेरेसीन बी साठवणुकीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना द्यावी लागणार

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 18, 2021
in जळगाव, शासकीय
0
Spread the love

(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) राज्यात म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असून या रुग्णांच्या उपचारासाठी एम्फोटेरेसीन बी इंजेक्शनाचा वापर करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होत असल्याने खाजगी रुग्णालयात दाखल म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना एम्फोटेरेसीन बी इंजेक्शन उपलब्ध करुन देण्याबाबत आयुक्त, आरोग्य सेवा व अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे कार्यालय, मुंबई यांचेकडील दिनांक 17 मे, 2021 रोजीच्या पत्रान्वये सुचना पाठवण्यात आलेल्या आहेत.

जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व भारतीय साथरोग अधिनियम, 1897 अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हा शल्य चिकित्सक, जळगाव, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्व खाजगी रुग्णालये, सर्व मेडीकल डिलर्स, किरकोळ मेडीकल विक्रेते यांच्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी महत्वपूर्ण आदेश काढले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील सर्व मेडीकल डिलर्स, सर्व घाऊक मेडीकल विक्रेते यांनी एम्फोटेरेसीन बी या इंजेक्शनचा साठा प्राप्त झाल्यास त्याबाबतची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव तसेच औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन कार्यालय, जळगाव यांना द्यावी अशी सूचना करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यातील खाजगी वितरकांकडे उपलब्ध एम्फोटेरेसीन बी इंजेक्शन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांचे सल्ल्याने औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन कार्यालय, जळगाव यांनी ज्या रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार केले जात आहे. अशा रुग्णालयांना आवश्यतेनुसार वाटप करण्यासंदर्भात निर्देशन दिले आहे.

अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव आणि जिल्हा शल्य चिकित्सक, जळगाव यांनी आपल्या अधिनस्त रुग्णालयात एम्फोटेरेसीन बी या इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध असल्यास म्युकरमायकोसिस उपचार करणाऱ्या खाजगी रुग्णालयांनाच एम्फोटेरेसीन बी चा पुरवठा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देवून उपलब्ध करुन द्यावे. जळगाव जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयात दाखल असलेल्या म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना संपूर्ण डोससाठी लागणारी औषधी एकाचवेळी रुग्णांना देण्यात येऊ नये. एक किंवा दोन दिवसांची मात्रा रुग्णालयास उपलब्ध करुन द्यावे. एम्फोटेरेसीन बी या इंजेक्शनचा साठा उपलब्ध झाल्यानंतर औषधांच्या किंमतीएवढी रक्कम खाजगी रुग्णालयाकडून जिल्हा आरोग्य सोसायटीच्या कोविड-19 या खात्यामध्ये जमा करण्याची कार्यवाही करावी.

या आदेशाचे उल्लंघन केल्यास ही बाब भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. असेही जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

Tags: aarogy vibhagamphotericin bcoronajilhadhikari abhijit rautmucormycosis
Previous Post

‘जीवन संघर्ष’ पुस्तक परीक्षण
(लेखिका :- से.नि. प्रा.डॉ. लीला (मोरे) धुलधोये)

Next Post

मनपा मध्ये निधी वाटपाचे राजकारण ; सेनेसोबत गेलेल्या काही नगरसेवकांमध्ये कुचबुच ..

Next Post

मनपा मध्ये निधी वाटपाचे राजकारण ; सेनेसोबत गेलेल्या काही नगरसेवकांमध्ये कुचबुच ..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!