• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आगामी निवडणुकीत आमचे 22 खासदार होणार, शिवसेना देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी असेल – संजय राऊत

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 15, 2021
in राजकीय
0
आगामी निवडणुकीत आमचे 22 खासदार होणार, शिवसेना देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी असेल – संजय राऊत
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनेक सूचक वक्तव्ये केली. शिवसेना राष्ट्रीय राजकारणात आहेच. भविष्यात आमचे 22 खासदार होतील, असं भाकित त्यांनी वर्तवलं आहे. सत्ता हाती आल्यापासून शिवसेनेने आपल्या विस्तारासाठी प्रयत्न सुरु केलेला आहे. राज्य तसेच राष्ट्रीय राजकारणात आपलं स्थान बळकट करण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी तसेच केंद्रीय पातळीवरच्या नेत्यांशी संपर्क वाढवलेला आहे. तसेच पक्षविस्तारासंदर्भात ते वेगवेगळी विधानं करताना दिसतात. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानिमित्त बोलताना त्यांनी अनेक सूचक वक्तव्ये केली.

2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील एकूण 48 जागांपैकी 18 जागांवर शिवसेनेने विजय मिळवला होता. आता संपूर्ण देशाला 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. या निवडणुकीत शिवसेना केंद्रस्थानी असेल, असे भाकीत संजय राऊत यांनी वर्तवले आहे. “शिवसेना पक्षप्रमुख पक्षाची दिशा ठरवतील. ठाकरे यांचे भाषण सकाळी 7.30 वाजता सुरु होईल. शिवसेना कोणती भूमिका घेणार हे पूर्ण देश समजून घेऊ इच्छत आहे. शिवसेना राष्ट्रीय राजकारणात आहेच. आता आमचे 22 खासदार होतील. 2025 नंतर शिवसेना देश पातळीवरील राजकारणात केंद्रस्थानी असेल,” असे संजय राऊत म्हणाले.

तसेच पुढे बोलताना “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं आजचं भाषण महत्वाचं आहे. महाराष्ट्र आणि देशात अनेक घटना घडल्या आहेत. यावेळी शिवतीर्थावर दसरा मेळावा होऊ शकत नाही. पण सर्व नियमाचं पालन करून मेळाव्याचे आोयजन करण्यात येत आहे. शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारे काम होईल, असेदेखील संजय राऊत म्हणाले.

विशेष म्हणजे पुढे बोलताना राऊत यांनी नोटबंदी, अमली पदार्थ तसेच इतर मुद्द्यांवर भाष्य केलं. अमली पदार्थांची तस्करी तसेच उलाढाल यांच्यातून येणारा पैसा हा देशविरोधी कारवायांसाठी वापरण्यात येतो, असं आरएएसचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणतात. देशात प्रखर राष्ट्रवादी सरकार आहे. तरीही देशात असं होत असेल तर ते चुकीचं आहे. सरसंघचालक मोहन भागवत कोणाला जबाबदार धरणार आहेत. नोटबंदी करताना मोदी यांनी देशाला वचन दिलं. पण तसं काही झालं नाही. याच मुद्द्यावरुन चार वर्षानंतर सरसंघचालक चिंता व्यक्त करत केलेली आहे, त्यांच्या बोलण्याला एक महत्त्व असतं, असं संजय राऊत म्हणाले.

 

Previous Post

जाणून घ्या; भगवान गडाचा इतिहास नेमका काय आहे? कोण होते भगवानबाबा?

Next Post

निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान – संभाजी भिडेंचं वक्तव्य

Next Post
निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान – संभाजी भिडेंचं वक्तव्य

निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान - संभाजी भिडेंचं वक्तव्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!