• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा बँक निवडणुक : मुक्ताईनगरात “सून” विरुध्द “सासरा” लढत होणार ? ; खासदार रक्षा खडसे निवडणुकीच्या मैदानात..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 17, 2021
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
जिल्हा बँक निवडणुकीत एकामागून एक अडथळे ; पालकमंत्र्यांना घटक पक्षांचे आव्हान..
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण | जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत भाजपाने स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर उमेदवारांच्या चाचपणी ला सुरुवात केली आहे. यामुळे निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांची उमेदवारी  भाजप नेते माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केली आहे. या निवडणुकी दरम्यान, खडसेंच्या मुक्ताईनगर असलेल्या बालेकिल्लात खा.रक्षा खडसे स्वतः उमेदवारी करणार असल्याने  राजकीय सामना पाहायला मिळणार आहे.

यामुळे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी सरळ लढत होण्याची शक्यता आहे अद्याप पर्यंत कोणत्या निवडणूक मतदार संघातून उमेदवारी करणार याबाबत खासदार खडसे यांचे  जाहीर झाले नसले तरी त्यांना मुक्ताईनगर येथून उमेदवारी देण्याच्या हालचाली भाजप मधून सुरू आहे. विशेष म्हणजे खा. रक्षा खडसे ह्या पहिल्यांदा जिल्हा बँकेची निवडणूक लढणार आहे. अद्याप पर्यंत शिवसेनेसोबत युती होणार का ही चर्चा होणे बाकी असून एकवीस दिवस माघारी करिता देण्यात आले आहे या दरम्यान ड्युटी करायची की नाही ? हा निर्णय घेण्यात येईल असे गिरीश महाजन यांनी सांगितले.

गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेली सर्वपक्षीय पॅनल बाबत सर्वपक्षीय नेत्यांची चर्चा अखेर संपुष्टात आलेली आहे. काँग्रेसने भाजप सोबत निवडणूक लढण्यास नकार दिल्यामुळे अखेर सर्वपक्षीय पॅनलवर पाणी फेरले गेले आहे. भाजपने स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अजिंठा गेस्ट हाऊस येथे भाजपची मॅरेथॉन बैठक सुरू आहे. भाजपने जिल्हा बँक निवडणूक लढण्याची तयारी सुरू केल्या नंतर माजी मंत्री गिरीश महाजन विरुद्ध माजी मंत्री एकनाथराव खडसे असा संघर्ष पेटताना दिसणार आहे.

ग्रामीण भागातील भाजपच्या पदाधिकाऱ्यां सोबत माजी मंत्री गिरीश महाजन,खा.रक्षा खडसे,खा. उन्मेष पाटील,आ. मंगेश चव्हाण,आ. राजुमामा भोळे,माजी आमदार स्मिता वाघ यांच्या उपस्थितीत बैठक पार पाडण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील भाजप पदाधिकाऱ्यांसोबत झालेंल्या बैठकी नंतर  खुद्द माजी मंत्री गिरीश महाजन यांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांसोबत पुन्हा बैठक घेतली आहे. या बैठकीत जिल्हा बँकेच्या गटा नुसार असलेले मतदार संघ तसेच विरोधी पक्षाकडून उभे राहणारे उमेदवार याबाबाबत मंथन भाजप नेत्यांचे सुरू आहे. ग्रामीण भागातील सहकार क्षेत्राशी परिचित चेहेऱ्या ना संधी देण्यात येणार आहे. जागेची चाचपणी करून योग्य उमेदवार दिला जाईल. भाजप कडून मतदारांच्या दृष्टीने मतदारांशी मजबूत नाळ असलेला उमेदवार देण्याच्या तयारी भाजपने चालवली आहे.

जिल्हा बँकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय नंतर माजी मंत्री गिरीश महाजन यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे त्यासाठी साम ,दाम, दंड ,भेद या कृतीचा प्रत्यय निवडणुकीदरम्यान येण्याची शक्यता आहे. जिल्हा बँकेच्या निवडणूक वर्तुळात सध्या तरी राष्ट्रवादीचे पारडे जड असताना भाजपला मोठे आवाहन पेलावे लागणार आहे.

Tags: bjp muktainagarbjp vs mahavikas aaghadieknath khadasegirish mahajanjalgaon jilhajilha bankmp raksha khadserashtrawadi
Previous Post

आगामी नगर पालिका निवडणूक आ.शिरीष चौधरींच्या नेतृत्वात…

Next Post

कॉग्रेसने भाजपला कामाला लावले, आगामी काळ स्पर्धेचा ; यश – अपयश क्षणिक…

Next Post
जिल्हा बँक निवडणूकिती एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे भरला उमेदवारी अर्ज

कॉग्रेसने भाजपला कामाला लावले, आगामी काळ स्पर्धेचा ; यश - अपयश क्षणिक...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!