• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘ईद- ए- मिलाद’ नियमांचे पालन करूनच साजरी करावी – जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आवाहन

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 18, 2021
in जळगाव
0
‘आव्हान निधी’ जिल्ह्यास मिळण्यासाठी आय पास प्रणालीचा उपयोग करा – जिल्हाधिकारी अभिजित राऊत
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण । शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मोठ्या संख्येने गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे ईद- ए- मिलाद (मिलादुन नबी) शक्यतो घरात राहूनच साजरी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी राऊत यांनी म्हटले आहे, की ‘कोविड-19’ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा ईद- ए-मिलाद साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केलेल्या आहेत. या सूचनांचे सर्वांनी पालन करावे. हा सण शक्यतोवर घरी राहूनच साजरा करावा. मात्र, मिरवणूक काढावयाची झाल्यास पोलिस प्रशासनाची पूर्व परवानगी घ्यावी. एका मिरवणुकीत जास्तीत जास्त पाच ट्रक आणि एक ट्रकवर जास्तीत जास्त पाच जणांना परवानगी अनुज्ञेय राहील. मिरवणुकीदरम्यान मास्क, सॅनेटायझर व सामाजिक अंतराचे पालन करावे.

मिरवणुकीत सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीने ध्वनी प्रक्षेपणाची व्यवस्था केल्यास ध्वनिप्रदूषण नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील. मिरवणुकीच्या दरम्यान स्वागतासाठी पेंडॉल बांधण्यासाठी शासनाच्या नियमानुसार संबंधित महापालिका, पोलिस व स्थानिक प्रशासनाने विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. या पेंडॉलमध्ये एकावेळी किती उपस्थिती असावी याबाबत स्थानिक प्रशासनाने ठरविलेल्या विहित नमुन्यांचे पालन करावे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 24 सप्टेंबर 2021 रोजीच्या शासन आदेशातील नियमांचे काटेकोरपणे पालन करून मास्क, सॅनेटायझर व सामाजिक अंतर राखून धार्मिक प्रवचनास परवानगी देण्यात येईल. प्रवचनाचे कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करुन शक्यतो ऑनलाईन पध्दतीने आयोजित करावेत. त्याचे केबल टी.व्ही. फेसबुक इत्यादी माध्यमातून थेट प्रक्षेपणाव्दारे इतरांना पाहण्याची व्यवस्था करावी,

ईद ए मिलादनिमित्त मिरवणुकीच्या मार्गावर प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या स्मरणार्थ तात्पुरत्या सबील (पाणपोई) लावण्यात येतात. त्यासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी. तेथे पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी उपस्थित राहू नये. तेथे सीलबंद पाण्याच्या बाटल्यांचे वितरण करावे. सबीलच्या ठिकाणी स्वच्छता राखावी तसेच सामाजिक अंतराचे पालन करावे. प्रतिबंधित क्षेत्रात लागू असलेले निर्बंध कायम राहतील. त्यात कोणतीही शिथिलता देण्यात येणार नाही. कोविड-19 परिस्थितीचा विचार करता रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर आदी उपक्रम राबवावेत. या उपक्रमांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करावी. या सूचनांच्या व्यतिरिक्त स्थानिक परिस्थिती पाहून निर्बंध अधिक कडक करण्याचे अधिकार संबंधित महापालिका, पोलिस आणि स्थानिक प्रशासनाला असतील.

कोविड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलिस, स्थानिक प्रशासनाने विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व मिरवणूक सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत आणखी काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचेही अनुपालन करणे आवश्यक राहील. या सूचनांचे पालन न केल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय दंड संहितेतील कलमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे.

 

Tags: abhijit raut
Previous Post

अमळनेर तालुक्यातील गांधली येथे चोरट्यांनी लांबविल्या ६३ बकऱ्या

Next Post

‘चोराच्या मनात चांदणं’; चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना टोला…

Next Post
‘चोराच्या मनात चांदणं’; चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना टोला…

‘चोराच्या मनात चांदणं’; चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना टोला...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!