जामनेर राजमुद्रा दर्पण । जामनेर तालुक्यातील गोद्री येथील एका ३४ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. रेशमाबाई वजीर तडवी (वय६५)रा.गोद्री. ता.जामनेर यांनी पहुर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली की, माझा मोठा मुलगा युनुस वजीर तडवी(वय३४)याचा मृतदेह आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास घरासमोरील ओट्यावर आढळून आला. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे त्याची पत्नी हाजराबाई हीने सांगितले. हाजराबाई हिचे गोद्री येथील नाना पुनमचंद नाईक(वय४०) याच्याशी अनैतिक संबंध आहे.या संबधाला कंटाळून मुलगा युनूस याने आत्महत्या केली.
याप्रकरणी पहुर पोलिस ठाण्यात पत्नी हाजराबाई तडवी व प्रियकर नाना नाईक यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक अरुण धनवडे करीत आहे.