• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आबांना विचारलं गृहखातं कसं असतं, त्यांनी मला सल्ला दिला, अन् झालंही तसंच – जयंत पाटील

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 19, 2021
in राजकीय
0
आबांना विचारलं गृहखातं कसं असतं, त्यांनी मला सल्ला दिला, अन् झालंही तसंच – जयंत पाटील
Spread the love

सांगली राजमुद्रा दर्पण । गृहमंत्री झाल्यावर ब्लडप्रेशर आणि शुगरचा त्रास सुरु होतो, हे मला अगोदरच आर आर आबांनी सांगितलं होतं आणि झालंही तसंच गृहमंत्री झाल्यानंतर मला ब्लड प्रेशरचा त्रास सुरु झाला. सांगली पोलीस दलाच्या वतीने पोलीस मुख्यालय याठिकाणी नूतन पोलीस अधीक्षक इमारत उभारण्यात येत आहे. या इमारतीच्या भूमिपूजन सोहळा जलसंपदा तथा सांगली जिल्हयाचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार सुमनताई पाटील,आमदार सुधीर गाडगीळ,आमदार विक्रम सावंत,कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम, जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना मंत्री जयंत पाटील म्हणाले, “पोलिसांना अधिकार वाढवून देणे गरजेचे आहे.आज कुठे काही गोंधळ झाला आणि पोलिसांनी हवेत जरी गोळीबार केला तर पोलिसांची चौकशी होते, गोंधळ घालणारे लांबच रहातात, त्यामुळे हवेत गोळीबार करणाऱ्यांची आम्ही चौकशी करतो, त्यामुळे आपण पोलिसांना संरक्षण देऊ, तेवढे अधिक धाडसाने पोलीस रस्त्यावर उतरतील.”

काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी गृहमंत्री झाल्यावर माझे ब्लड प्रेशर वाढल्याचे सांगितले. खरंतर 2009 मध्ये आर आर आबा पाटील यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पक्षाने आपल्यावर गृहखात्याची जबाबदारी दिली होती. पण गृहखाते घेण्याआधी एका लग्नाकार्यात आर आर आणि मी दोघे गेलो होतो. त्यावेळी आपण आबांना विचारले, गृहखाते कसं असतं? त्यावेळी आबांना मला विचारले की ? तुम्हाला ब्लड प्रेशर किंवा शुगर आहे का? मी आबांना सांगितलं, मला अजिबात त्रास नाही. त्यावर आबा म्हणाले गृहखाते घ्या, तुम्हाला दोन्ही गोष्टी सुरू होतील.आणि गृहमंत्री झाल्यानंतर आपल्याला ब्लड प्रेशरचा त्रास सुरु झाला,आपल्या खासगी सचिवालाही ब्लड प्रेशर सुरू झाले, इतके तणावपूर्ण काम असते, त्यामुळे तेव्हापासून माझं मत आहे, की आता ब्लड प्रेशर सुरू झाले आहे, शुगर मागे लावून घ्यायचा नाही,अशी आपली भूमिका आहे.

 

 

Tags: jayant patil
Previous Post

पतीची गळफास घेऊन आत्महत्या; पत्नी व प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

Next Post

लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच मिळणार महाविद्यालयात प्रवेश…

Next Post
लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच मिळणार महाविद्यालयात प्रवेश…

लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच मिळणार महाविद्यालयात प्रवेश...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!