• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रसाद लाड यांचा मुंबई महापालिकेवर इंजेक्शन घोटाळ्याचा आरोप

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 19, 2021
in Uncategorized
0
प्रसाद लाड यांचा मुंबई महापालिकेवर इंजेक्शन घोटाळ्याचा आरोप
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण । महापालिकेनं कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोनोक्लोनल इंजेक्शन मागवले होते. हे एक इंजेक्शन 1 लाखाचं आहे. असे 200 इंजेक्शन वाया गेले. पण आता पुन्हा 60 कोटी रुपयांचे इंजेक्शन मागवण्यात आले आहेत. हे इंडेक्शन गरज नसताना का मागवण्यात आले?. त्याचबरोबर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाबद्दल ट्विट न करता पोलीसांकडे तक्रार दाखल करावी. म्हाडाच्या घरात कोण घुसलंय त्याबाबत रितसर चौकशी करावी. शिवसेनेच्या माध्यमातून घुसखोरांना घरं दिली गेली असतील तर या दोन पक्षांमध्ये समन्वय नाही का? असा प्रश्न लाड यांनी विचारला आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी ‘म्हाडाच्या ट्रांझिट कॅम्पमध्ये होणारी घुसखोरी ही अत्यंत लज्जास्पद बाब आहे. कुणीही येतं आणि कुणाच्याही घरात घुसतं. ‘जिसकी लाठी उसकी भैस’ अशा पद्धतीने घरे बळकावली जातात. मी म्हणजे तेथील रेंट कलेक्टर, तेथील म्हाडाचे अधिकारी आणि तेथील पोलिस अधिकारी हे सगळे या प्रकरणात सामिल आहेत. गरीब माणसाने जगायचं कस. ह्यावरती काहीतरी कठोर कारवाई करावीच लागेल. ज्याच हक्काच घर आहे त्याला त्याच घर मिळायलाच हवं. घुसखोर कोणिही असो त्याला घरातून काढून कायद्याच्या कचाट्यात अडकवून जेलमध्ये टाकायला हवं’, असं ट्वीट केलं होतं. त्यावरुनच लाड यांनी आव्हाडांना टोला लगावलाय.

दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना नेते आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी डिसेंबरमध्ये भाजपचे 15 ते 20 नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं सांगत एकच खळबळ उडवून दिली आहे. मात्र, यशवंत जाधव दिशाभूल करत आहेत. महापालिकेवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. त्यांना एवढंच सांगेन की आमचे 15 ते 20 दाखवत राहाल आणि तुमचेच 15-20 नगरसेवक कधी आमच्या गळाला लागतील हे तुम्हालाही कळणार नाही, असा इशाराच लाड यांनी जाधवांना दिलाय.

डिसेंबरमध्ये मुंबईत राजकीय भूकंपाचे संकेत जाधव यांनी दिले आहेत. भाजपचे 15 ते 20 नगरसेवक शिवसेनेते प्रवेश करणार आहेत. पक्ष नेतृत्वाच्या मनमानी कारभाराला कंटाळलेले नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा यशवंत जाधव यांनी केला आहे. ‘मी एक सांगतो आहे की, मुंबई महापालिकेत असलेले भाजपचे काही नगरसेवक निश्चितपणे त्यांच्या नेतृत्वाला कंटाळले आहेत. नेतृत्वाचा मनमानी कारभार, त्यांना कुठेही विचारात न घेणं, त्यांना डावलणं, यातून त्यांची निराशा होत आहे. परिणामी अशी मंडळी निश्चितपणे वेगळा विचार करत आहेत. त्याचा जो निकाल आहे तो डिसेंबरला मुंबई शहराला कळेल. भाजपची ही मंडळी शिवसेनेच्या संपर्कात आहेत. जे नेतृत्व आहे ते त्यांना जुमानत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यावेळी त्यांनी शिवसेनेचा आधार वाटतोय’, असा दावा यशवंत जाधव यांनी केलाय.

 

Previous Post

सर्वच मंत्र्यांनी भाजपला प्रत्युत्तर देण्याची वेळ आलीय – भास्कर जाधव

Next Post

दारूसाठी पैसे न दिल्याने तरूणावर चाकूहल्ला; पोलिसात गुन्हा दाखल

Next Post
दारूसाठी पैसे न दिल्याने तरूणावर चाकूहल्ला; पोलिसात गुन्हा दाखल

दारूसाठी पैसे न दिल्याने तरूणावर चाकूहल्ला; पोलिसात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!