• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जयंत पाटलांवर केशव उपाध्ये यांची जोरदार टीका…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 20, 2021
in राजकीय
0
जयंत पाटलांवर केशव उपाध्ये यांची जोरदार टीका…
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण । पनवेल येथे इंजिनिअरिंग कॉलेज उभारण्याच्या नावाखाली सरकारकडून नाममात्र दरात मिळवलेल्या जमिनीचा काही भाग महामार्ग विस्तारीकरणात गेल्यानंतर त्याचा मोबदला संबंधित शिक्षणसंस्थेनं मिळवल्याचं प्रकरण समोर आलंय. महत्वाची बाब म्हणजे ही संस्था राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी संबंधित असल्याची माहिती मिळत आहे. प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी याबाबत जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केलीय.

‘दोन्ही हातांनी मिळेल ते लुटायचे हीच तर राज्य सरकारातील मंत्र्याची खासियत. आधी सरकारकडून जमिन घ्यायची मग सरकारनेच अधिग्रहीत केली म्हणून सरकारकडून भरभक्कम मोबदला घ्यायचा. सरकार असो सहकार, स्वाहाकार हाच मंत्र हीच यांची घोषणा’, अशा शब्दात केशव उपाध्ये यांनी जयंत पाटलांवर निशाणा साधलाय.जयंत पाटली हे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना 2004 मध्ये या संस्थेला ही जमीन देण्यात आली होती. त्यावर संस्थेनं अजूनही महाविद्यालय उभारलं नाही. मात्र, सरकारकडून मिळालेल्या 14 एकरपैकी दोन एकर जमीन सरकारच्याच भूसंपादनासाठी देऊन संस्थेनं तीसपट मोबदला मिळवल्याची माहिती मिळतेय. पनवेल तालुक्यातील शिराढोण हे गाव आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे मूळ गाव आहे. मुंबई-गोवा महामार्गालत कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या अलीकडे वसलेल्या या गावाची आकारीपड आणि गुरचरण जमीन महामार्गाला लागून आहे.

मुंबई ड्रग्स प्रकरणावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. अल्पसंख्यांक विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीसह भाजपवर जोरदार टीका केलीय. मलिकांच्या या टीकेलाही केशव उपाध्ये यांनी पलटवार केलाय. नवाब मलिक मंत्रिपदाचे भान सोडून एनसीबीने अटक केलेल्या आरोपींची वकिली सुरू केल्याचे दिसते. तथापि, मीडिया ट्रायलमध्ये भारतीय जनता पार्टीवर टीका करून कोणी निर्दोष ठरणार नाही आणि सत्यही लपणार नाही. असत्याची कास धरून स्वतःला आरोपी करू नका, असा टोला केशव उपाध्ये यांनी लगावला.

अंमलीपदार्थांच्या विरोधात कारवाई करणाऱ्या एनसीबीने एका जहाजावर छापा मारून काहीजणांना पकडले. याबाबत राज्याचे नवाब मलिक पत्रकार परिषदांच्या माध्यमातून मीडिया ट्रायल चालवत आहेत आणि आरोपींना मदत होईल, अशा रितीने तपासी यंत्रणेवर टीका करत आहेत. त्यामध्ये ते पुन्हा पुन्हा भारतीय जनता पार्टीलाही ओढत आहेत. पण अशा रितीने भाजपावर टीका करून आरोपींची सुटका होऊ शकत नाही. त्यासाठी न्यायालयानेच निकाल द्यावा लागतो. तपासी यंत्रणेला सातत्याने न्यायालयासमोर उभे रहावे लागत आहे. भाजपाचे कोणी दोषी असेल तर त्यालाही शिक्षा होईलच, असंही उपाध्ये म्हणाले.

 

Previous Post

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम सेंटरसाठी जिल्ह्यातील चार शाळांची निवड…

Next Post

दीपनगरातील प्रकल्प ६ महिने लांबणीवर…

Next Post
दीपनगरातील प्रकल्प ६ महिने लांबणीवर…

दीपनगरातील प्रकल्प ६ महिने लांबणीवर...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!