• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ईडी घाबरण्याचं कारण नाही, हा विषय आता नेहमीचा झालाय, नाना पटोलेंचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 20, 2021
in राजकीय
0
ईडी घाबरण्याचं कारण नाही, हा विषय आता नेहमीचा झालाय, नाना पटोलेंचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण । नांदेड येथे  बड्या नेत्यावर ईडीची कारवाई होण्याचे संकेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. त्यानंतर अशोक चव्हाण यांनीही पाटील यांना प्रत्युत्तर दिलं. जनतेच्या मूळ प्रश्नांना बगल देण्यासाठी हा प्रकार केला जातोय. ईडी विषय आता नेहमीचा झालाय, त्याला घाबरण्याचं कारण नाही, असं नाना पटोले म्हणाले. काँग्रेस याला घाबरणार नाही. आम्ही जनतेच्या प्रश्नावर केंद्र सरकारविरोधात लढत राहणार. स्वीस बँकेत काळा पैसा वाढला आहे. हे पैसे भाजपच्या लोकांचे आहेत का? सगळे चोर आणि हे साव अशी भूमिका भाजपवाले घेत आहेत. पण लोक आता त्याला हसत आहेत. अमित शाह यांच्या मुलाचे उत्पन्न एका वर्षात 9 हजार पटीने वाढले असेल तर मोदींच्या बाजूला बसणाऱ्या अमित शाह यांनाच भीती वाटायला हवी, असा टोला पटोले यांनी लगावलाय.

दुसरीकडे प्रदेश काँग्रेसच्या मुख्य प्रवक्तेपद अतुल लोंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर सचिन सावंत नाराज असून त्यांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिलाय. तसंच हायकमांडला आपल्याला या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी त्यांनी केल्याचं कळतंय. याबाबत बोलताना सचिन सावंत यांचं पत्र मला आलेलं नाही. याबाबत त्यांच्याबरोबर चर्चा करु. त्यांची नाराजी असली तर बसून ती दूर करण्याचा प्रयत्न करु, असं पटोले म्हणाले.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांना अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पाटलांचं वक्तव्य म्हणजे निवडणूक पाहून खळबळ माजवण्याचा प्रयत्न आहे. चंद्रकांत पाटील यांना इतकी माहिती मिळते कुठून? असा सवाल करत लोकशाहीत असे अपेक्षित नसल्याचं चव्हाण म्हणाले.

नांदेडमधील बड्या नेत्यांवर ईडीची किंवा आयकरची कारवाई होणार आहे का? असा सवाल माध्यमांच्या प्रतिनिधींनी पाटील यांना केला होता. हा सवाल येताच चंद्रकांतदादा आधी हसले. त्यानंतर त्यांनी पॉझ घेतला आणि आपल्या स्टाईलने उत्तर दिलं. मी काही तपास यंत्रणांचा अधिकारी नाही. त्यामुळे मला माहीत नाही. पण माझ्या हसण्यावरून काही कळलं तर ते कॅरी करायला हरकत नाही, असं सूचक विधान चंद्रकांतदादांनी केलं.

 

Previous Post

दिवाळी जोमात साजरी होणार ; जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील फटाके विक्री बंदी उठवली

Next Post

पाचोरा तालुक्यातील बदरखे येथे गॅस सिलेंडरचा स्फोट; संसार उपयोगी वस्तू जळून खाक

Next Post
पाचोरा तालुक्यातील बदरखे येथे गॅस सिलेंडरचा स्फोट; संसार उपयोगी वस्तू जळून खाक

पाचोरा तालुक्यातील बदरखे येथे गॅस सिलेंडरचा स्फोट; संसार उपयोगी वस्तू जळून खाक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!