• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेंदुर्णीत पथनाट्याद्वारे नागरिकांची कायद्याच्या बद्दल जनजागृती

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 28, 2021
in जळगाव, शासकीय
0
Spread the love


शेंदुर्णी ता.जामनेर राजमुद्रा दर्पण |जामनेर तालुका विधी सेवा समिती जामनेर व जामनेर तालुका वकील संघ जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आज बुधवार दि.२७ आक्टोंबर रोजी पथनाट्याद्वारे नागरिकांना कायद्याची माहिती ,त्यांचे हक्क, अधिकार, कर्तव्य, लोकन्यायालयाचे महत्त्व तसेच विविध कायद्यांची माहिती या द्वारे देऊन समाजप्रबोधन करण्यात आले .


स्टेट बँक शाखा शेंदुर्णी जवळ आयोजित या कार्यक्रमात गलवाडा ता.सोयगांव येथील हरहुन्नरी कलावंत यांनी आपल्या खास ग्रामीण शैलीत पथनाट्याद्वारे कायद्याचे महत्त्व, नागरिकांना कोर्टाच्या माध्यमातून मिळणाऱ्या सुविधा आदींची माहिती दिली.
या कार्यक्रमात पोउनि.दिपक मोहिते यांनी यावेळी कायद्यात रहाल तर सदैव फायद्यातच रहाल असे सांगुन नागरिकांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी जामनेर वकील संघाचे अध्यक्ष अँड. किशोर राजपुत, माजी उपसरपंच व सहकार, राजकीय क्षेत्रातील नेते गोविंद अग्रवाल, पं.दिनदयालजी पतसंस्थेचे चेअरमन अमृत खलसे,शेंदुर्णी दुरक्षेत्रचे पोउनि.दिपक मोहिते, स्विकृत नगरसेवक अँड. धर्मराज सुर्यवंशी तसेच जामनेर व सोयगांव तालुक्यातील वकील बांधव,पत्रकार,नागरिक, नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुत्रसंचालन अँड. देवेंद्र पारळकर यांनी तर आभार अँड. राहुल बावसकर यांनी मानले.

Tags: jalgaon jilhapathnatyshedurani
Previous Post

अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांच्या यादीत जळगाव जिल्ह्याचा समावेश करा : आ. किशोर पाटील

Next Post

अजित पवारांच्या बहिणींच्या घरानंतर आता मावस भाऊ जगदीश कदम यांच्या घरावर ईडीची छापेमारी…

Next Post
अजित पवारांच्या बहिणींच्या घरानंतर आता मावस भाऊ जगदीश कदम यांच्या घरावर ईडीची छापेमारी…

अजित पवारांच्या बहिणींच्या घरानंतर आता मावस भाऊ जगदीश कदम यांच्या घरावर ईडीची छापेमारी...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!