• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची केंद्र सरकारवर टीका…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 28, 2021
in राजकीय
0
इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची केंद्र सरकारवर टीका…
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण । इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. पेट्रोल, डिझेलचे दरवाढ आपल्या भल्यासाठीच होत आहे, सार्वजनिक वाहतुकीतील प्रवाशांचा टक्का घसरतोय हे केंद्राच्याही लक्षात आलं आहे. म्हणूनच त्यांनी इंधनाचे दर वाढवायला सुरुवात केली आहे. इंधन परवडेनासं झालं तर तुम्ही म्हणतात तसं प्रवासी तुमच्या बाजूने येतील की नाही? म्हणून चांगल्या हेतूने सरकार इंधन दरवाढ होत आहे. पण आपण लक्षातच घेत नाही,  अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

खरं तर अभ्यास करण्याचं काम आमचं असतं तर आम्ही राजकारणात आलोच नसतो. मार्क देण्याचं काम आमच्याकडे आलं आहे. साहजिकच आहे शासन, प्रशासन आपल्या सर्वांची जबाबदारी एक असते. अशावेळी राजकारण एका बाजूला ठेवायचे असते. जनतेला सोयी सुविधा देणं हे आपलं कर्तव्य आहे. ते पार पाडताना त्यात राजकारण येऊ नये. येऊ देणारही नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. वाहतूक व्यवस्था ही जशा आपल्या शरीरात रक्तवाहिन्या असतात तशा या शहराच्या वाहिन्या आहेत. एमएमआर रिजनची लोकसंख्या ऑस्ट्रेलिया एवढी आहे. ऑस्ट्रेलिया एवढा महाकाय देश. त्याच्याएवढी लोकसंख्या आपल्या एवढ्याश्या भागात सामावलेली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

मुंबईत त्यावेळी ट्राम्स होत्या. पुण्यात घोडागाड्या होत्या. त्यातून फिरणं ही गंमत असायची. मी लोकल आणि बेस्ट बसेसमधूनही प्रवास केला आहे. बाहेरच्या देशात ज्या सुविधा आहेत त्या आपण आता आता आणत आहोत. पण आपल्याकडे अॅटोमॅटिक लोकल सेवा आधीच होती. ती जगात कुणाकडेही नाही. अॅटोमॅटिक लोकल सेवा म्हणजे प्रवासी स्टेशनला उभा राहिला तर तो लोकलमध्ये आपोआप ढकलला जातो आणि बाहेरही आपोआप फेकला जातो. ही सेवा जगात कुठेच नाही. आपली सेवा ऑटो रेल झाली आहे. हा बाहेरच्या लोकांसाठी अभ्यासाचा विषय आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हणताच एकच हशा पिकला.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील प्रवाशांचा टक्का घसरत आहे. त्याबद्दल आपण चिंता व्यक्त केली. सार्वजनिक वाहतूक यामधला प्रवाशांचा टक्का घसरला त्याला दोन कारणं आहेत. गेल्या दीड वर्षातील कोरोनाची परिस्थिती हे एक कारण असेल. दुसरं कारण मीही असेल. मीच लॉकडाऊन लावला होता. टक्का घसरला होता तो कोरोनाने किती घसरला हे थोड्या दिवसाने कळेल, असंही ते म्हणाले.

 

 

Tags: udhav thakre
Previous Post

नवाब मलिकांकडून समीर वानखेडेंची बदनामी; त्यांना लाज वाटायला हवी, किरीट सोमय्यांचा घणाघात

Next Post

भूल थापा देणाऱ्यांवर विश्‍वास ठेवू नका : ना. गुलाबराव पाटील

Next Post
भूल थापा देणाऱ्यांवर विश्‍वास ठेवू नका  : ना. गुलाबराव पाटील

भूल थापा देणाऱ्यांवर विश्‍वास ठेवू नका : ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!