• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा, भडगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाला १०० कोटी रूपयांची जाहीर; आ. किशोर पाटील यांच्या प्रयन्नांना यश

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 29, 2021
in जळगाव
0
पाचोरा, भडगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाला १०० कोटी रूपयांची जाहीर; आ. किशोर पाटील यांच्या प्रयन्नांना यश
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण । पाचोरा-भडगाव तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. शेतकरी अडचणीत सापडलेला होता. त्या पार्श्वभूमीवर  आ. किशोर पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याकरिता पाठपुरावा केला.  त्याची फलश्रुती म्हणुन राज्य शासानने रब्बी व खरीप या दोन्ही हंगामाची मदत जाहीर करून प्रत्यक्ष वाटपाला ही सुरवात केली आहे. ऐन दिवाळीत दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना १०० कोटी रूपये मदत मिळणार आहे. आ. किशोर पाटील यांच्या प्रयन्नांना यश आले आहे.

याप्रसंगी ऍड. दिनकर देवरे, दीपक राजपूत, डॉ. भरत पाटील , ऍड. अभय पाटील आदी उपस्थित होते. आ. किशोर पाटील म्हणाले की, रब्बी हंगामात मार्च महीन्यात भडगाव, पाचोरा तालुक्यात मोठ्याप्रमात नुकसान झाले होते. त्यावेळी मी स्वत: शेतकऱ्यांची व्यथा पाहीली. ते दुख: विसरून शेतकऱ्यांनी खरीप हंगाम उभा केला. मात्र पुन्हा ऑगस्ट ते ऑक्टोबर महीन्यात अतिवृष्टीत पाचोरा-भडगाव तालुक्यातील खरीप हंगाम पुर्णत: पाण्यात बुडाला. कापुस, मका, सोयाबीन, ज्वारी, बाजरी पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. ही परीस्थीती पाहणे माझ्यासाठी अवघड होते. म्हणून मी शेतकऱ्यांशी फेसबुकव्दारे संवाद साधत शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषीमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना एसडीआरएफच्या निकषाच्या तीन पट भरपाई द्यावी, अशी मागणी केली.

जळगाव जिल्ह्याला ३५ कोटी रुपये अनुदान प्राप्त झाले. त्यापैकी १९ कोटी ५० लाख अनुदान भडगाव-पाचोरा या तालुक्यांना मिळाले त्यातील १८ कोटी एकट्या भडगाव तालुक्याला तर पाचोरा तालुक्याला १ कोटी ३१ लाख रुपये एवढे अनुदान प्रत्यक्ष प्राप्त झाले आहेत. त्याचे वाटपाचे काम महसूल प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात या अनुदानाचे पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी निश्चितपणे आनंदात जाईल याची मला खात्री आहे आणि आनंदही असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगीतले.

 

Tags: aamdar kishor patil
Previous Post

भाजपा वगळून जिल्हा बँकेत संदर्भात महा विकास आघाडीची बैठक

Next Post

भाजपने प्रॅक्टीस म्हणून मोर्चा काढावा, मोर्चाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह येतो, या शिवसेना नेत्याने केले विधान….

Next Post
भाजपने प्रॅक्टीस म्हणून मोर्चा काढावा, मोर्चाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह येतो,  या शिवसेना नेत्याने केले विधान….

भाजपने प्रॅक्टीस म्हणून मोर्चा काढावा, मोर्चाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह येतो, या शिवसेना नेत्याने केले विधान....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!