• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत २७ कोटी सात लाख २९ हजारांची भरपाई मंजूर….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 30, 2021
in कृषी, जळगाव
0
प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत २७ कोटी सात लाख २९ हजारांची भरपाई मंजूर….
Spread the love

जळगाव राजमृद्रा दर्पण | प्रधानमंत्री पीकविमा योजना २०२१- २२ खरीप हंगामासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी  योजना राबविण्यात आली होती. याअंतर्गत विमा कंपनीकडून २७ कोटी सात लाख २९ हजारांची भरपाई मंजूर झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिली.

प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत अमळनेर, पारोळा व चोपडा तालुक्यांतील उडीद, मूग आणि अमळनेर तालुक्यासाठी बाजरी-कापूस या पिकांसाठी खरीप हंगामातील पावसाच्या खंडामुळे प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या पिकांची अधिसूचना काढून विमा कंपनीला २५ टक्के आगाऊ नुकसानभरपाई रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना देण्याचे आदेशित केले होते. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही याबाबत शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे आयसीआयसीआय लोबार्ड (भारती एक्सा) विमा कंपनीकडून एकूण २७०७.२९ लाख रक्कम मंजूर झाले आहे.

ही नुकसानभरपाई अमळनेर, पारोळा, चोपडा तालुक्यांतील २० मंडळांमध्ये मूग पिकांसाठी ४४ लाख, तर उडीद पिकाकरिता सहा लाख रुपये, अमळनेर तालुक्यातील आठ मंडळांमध्ये बाजरी पिकासाठी तीन लाख, तर कापूस पिकाकरिता २७०६.७६ लाख रक्कम मंजूर झाली आहे. ही रक्कम विमा कंपनी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याचेही संभाजी ठाकूर यांनी सांगितले आहे

 

Tags: pradhanmantri pik vima yojanasambhaji thakur
Previous Post

गणेश कॉलनीत दुचाकीला ट्रकची धडक; एक ठार, एक गंभीर

Next Post

एलईडीप्रश्‍नी महापालिकेत शरम करो आंदोलनप्रकरणी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल…

Next Post
एलईडीप्रश्‍नी महापालिकेत शरम करो आंदोलनप्रकरणी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल…

एलईडीप्रश्‍नी महापालिकेत शरम करो आंदोलनप्रकरणी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!