• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारत-पाक युद्धातील नांदेडच्या माजी सैनिकाला मुलगा-सून-नातवाने संपवलं

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 7, 2021
in क्राईम, महाराष्ट्र
0
Spread the love

नांदेड राजमुद्रा दर्पण । लहुजी नगर येथे राहणारे माजी सैनिक नारायणराव साबळे यांना जन्मदात्या मुलाने मारहाण केली. यात दगडाचा जबर मार लागल्याने गंभीर जखमी झालेल्या पित्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. नारायणराव साबळे यांनी 1965 ते 1971 या काळात झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात सहभाग नोंदवून आपल्या नावे इतिहास नोंद केला होता. मात्र स्वंतत्र सैनिक असलेल्या बापालाच संख्या मुलानेच संपविल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर शहरात लहुजी नगर येथे सेवानिवृत्त माजी सैनिक नारायणराव लक्ष्मण साबळे राहत होते. 6 नोव्हेंबर रोजी दुपारी जुन्या भांडणाचा राग मनात धरुन मुलगा विजय साबळे (वय 45 वर्ष) यांनी वडिलांना मारहाण केली. विजयची 40 वर्षीय पत्नी आणि 18 वर्षांचा मुलगा शुभम विजय साबळे यांनीही मारहाणीत मदत केली.विजयने वडिलांना बुक्क्या आणि दगडाने मारहाण केली. यात दगडाचा जबर मार लागल्याने वडील नारायण साबळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना धाकटा मुलगा दिलीप साबळे आणि पत्नी गयाबाई यांनी अर्धापूर येथील शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मयत झाल्याचे सांगितले. सेवानिवृत्त सैनिक नारायणराव साबळे यांच्या खून प्रकरणी दिलीप नारायण साबळे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी विजय नारायणराव साबळे, शुभम विजय साबळे, सौ. साबळे या तिघा जणांच्या विरूद्ध कलम 302, 323, 504, 506, 34 भादंवि प्रमाणे अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक जाधव हे करीत आहेत.

 

.

Tags: maharashtra polismurdar nadednanded jilhananded polis
Previous Post

आजचे “जलपूजन” परिसरातील जनतेसाठी भविष्यातील “लक्ष्मीपूजन” असेल – खा. उन्मेश दादा पाटील

Next Post

बुलढाणा सहकारी पतसंस्थेत सापडलेले ते कोट्यवधी रुपये कुणाचे?; मंत्र्यांचे नाव समोर येण्याची शक्यता ..

Next Post
किरीट सोमय्यांचा राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांवर आरोप…..

बुलढाणा सहकारी पतसंस्थेत सापडलेले ते कोट्यवधी रुपये कुणाचे?; मंत्र्यांचे नाव समोर येण्याची शक्यता ..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!