• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राजीव गांधी यांच्या पुण्यतिथिनिमित्त लोणवाडी गावात फवारणी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 21, 2021
in राजकीय
0
Spread the love

( राजमुद्रा वृत्तसेवा)

भारतरत्न माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथिनिमित्त युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटील यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालय बोदवड येथे मास्क, सँनिटायझर किट व फळवाटप करण्यात आले. त्यानंतर लोणवाडी येथे संपुर्ण गावात सँनिटायझर फवारणी करण्यात आली.

भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या ४७ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधत सकाळी ग्रामीण रुग्णालय बोदवड येथे रुग्णांना सँनिटायझर, मास्क व फळवाटपाचा कार्यक्रम युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटिल यांच्या ऊपस्थितीत पार पडला. शहरातील डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पीटल असलेल्या ग्रामीण रुग्णालयात प्रथम रुग्णांना चहा व बिस्किट वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर मास्क सँनिटायझर व फळांचा कँरेट रुग्णांना वाटण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या वैदयकीय अधिक्षकांच्या ताब्यात देवुन कोरोना रुग्णांना वाटप करण्यात आला. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैदयकीय अधिक्षक डॉ अमोल गिरी व डॉ. शर्मा यांनी आभार व्यक्त केले.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी ग्रामस्थांच्या मागणीवरुन लोणवाडी येथे संपूर्ण गावात सँनिटायझर फवारणी करण्यात आली. यावेळी गावातील प्रत्येक प्रभागात मास्क वाटप करण्यात आले. गावात मास्क व सँनिटायझरचे महत्त्व पटवून देत युवक काँग्रसचे जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांचेकडून कोरोनाविषयक जनजागृती करण्यात आली. काही दिवसां अगोदर सापडलेले पॉझिटिव्ह रुग्ण विना तपासणीचे गावात मोकाट फिरत असल्याने ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली. यावेळी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटील यांनी आरोग्य अधिकारी डॉ अजय सपकाळ यांना संपर्क साधत सदरील प्रकार लक्षात आणून दिला. आमदार चंद्रकांत पाटिल यांच्याकडून टेस्टिंग किट ऊपलब्ध झाल्याने तपासणी शिबिर मोहिम बळकट करणार असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ अजय सपकाळ यांनी कळविले.

यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटील, माजी सरपंच संतोष देठे, माजी सरपंच मोहन देठे, ग्रामपंचायत सदस्य शेख रियाज अब्दूल नबी, अजाब ठेकेदार, माजी ग्रामपंचायत सदस्य रविंद्र महाले, मुकेश चौधरी, रोजगार सेवक दसरथ राऊत, आशा सेविका छाया राऊत, सविता साळवी, अंगणवाडी मदतनीस आशाबाई साळवी, अंगणवाडी मदतनीस पंचफूला देठे, अंगणवाडी सेविका शकुंतला राजपूत, अंगणवाडी सेविका निर्मला पिसे, ऊर्मिला देठे, ऊमेश बिजागरे, गजानन पाटिल, बंटी जावरे, अमोल व्यवहारे यांच्यासहित अन्य ग्रामस्थ ऊपस्थित होते.

Tags: bodavadcoronadedicate covid hospitalhitesh patilrajiv gandhiyuvak congress
Previous Post

मान्सूनचे अंदमान निकोबारात आगमन

Next Post

‘राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग महानगर अध्यक्ष’ पदावर जितेंद्र चांगरे

Next Post

'राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग महानगर अध्यक्ष' पदावर जितेंद्र चांगरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!