• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मनसेचे अध्यक्ष्य राज ठाकरे करणार मध्यस्थी; थोड्याच वेळात घेणार शरद पवारांची भेट..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 12, 2021
in राजकीय
0
मनसेचे अध्यक्ष्य राज ठाकरे करणार मध्यस्थी; थोड्याच वेळात घेणार शरद पवारांची भेट..
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण।  एसटी कामगारांचा संप मिटावा आणि कामगारांच्या मागण्या मंजूर व्हाव्यात म्हणून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे मध्यस्थी करणार आहेत. राज ठाकरे थोड्याच वेळात शरद पवार यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे संपाचा तिढा सुटणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. गेल्या 15 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यावर अजूनही तोडगा निघाला नाही. काल एसटी कर्मचाऱ्यांनी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेऊन आपलं म्हणणं मांडलं होतं. राज यांनी कामगारांच्या सर्व भावना समजून घेतल्या असून आज 5.30 वाजता शरद पवार यांची भेट घेऊन कामगारांची कैफियत मांडणार आहेत. त्यामुळे शरद पवार राज यांना काय आश्वासन देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

एसटी कामगारांनी राज ठाकरे यांच्याकडे कायदेशीर बाबी मांडून त्यांच्या मागण्याही सांगितल्या. सरकारची भूमिका काय आहे हे सुद्धा सांगितलं. त्यावर राज यांनी कामगारांना मदत करण्याचं आश्वासन दिलं. मी तुमचं नेतृत्व करेल. तुमच्यासाठी सरकारशी चर्चा करेल. मात्र तुम्ही आत्महत्या करू नका, असं आवाहन राज यांनी केलं होतं. या बैठकीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मीडियाशी संवाद साधला होता. राज ठाकरे ताबडतोब सरकारशी बोलणार आहेत. ते स्वत: जातीनिशी लक्ष घालून हा प्रश्न सोडवणार आहेत. एकदा सरकारशी बोलणं झालं की मग कामगारांशी बोलेन असं आश्वासन राज यांनी दिलं आहे, असं नांदगावकर यांनी सांगितलं. कोणीही आत्महत्या करू नका. आत्महत्या हा काही पर्याय नाही. आपल्याला लढाई लढायची आहे. त्यासाठी आपल्या मनगटात रक्त आणि ताकद हवी. आत्महत्या करून डाव अर्धवट सोडायचं नाही. मनसे या लढाईत सोबत राहील, असं आश्वासनही राज यांनी दिलं आहे. राज यांना सरकारमध्ये कोणाशी बोलायचं याची पुरेपूर कल्पना आहे. तेच बोलतील तेव्हा तुम्हाला कळेल. तुम्हालाही माहीत आहे ते कुणाशी बोलतील, असंही नांदगावकर यांनी सांगितलं होतं.

 

Tags: raj thackeray
Previous Post

अल्पवयीन मुलीने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव..

Next Post

आमदार गिरीश महाजनांचे पुन्हा जिल्ह्यात महाविकास आघाडीशी संघर्षाचे संकेत

Next Post
आमदार गिरीश महाजनांचे पुन्हा जिल्ह्यात महाविकास आघाडीशी संघर्षाचे संकेत

आमदार गिरीश महाजनांचे पुन्हा जिल्ह्यात महाविकास आघाडीशी संघर्षाचे संकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!