मुंबई राजमुद्रा दर्पण। अभिनेता आमिर खान याचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’ ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. यामागे पोस्ट प्रोडक्शनचे काम अपूर्ण असल्याचे कारण देण्यात आले होते. या चित्रपटात आमिरच्या व्यक्तिरेखेचा संपूर्ण जीवनप्रवास दाखवण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. या कारणास्तव VFX वर विशेष लक्ष दिले जात आहे. आता त्याच्या निर्मात्यांनी एक नवीन पोस्टर शेअर केला असून, त्याची नवीन रिलीज डेट जाहीर केली आहे.
आमिर खान प्रॉडक्शनने भारतीय प्रेक्षकांना ‘लगान’, ‘तारे जमीन पर’, ‘दंगल’ आणि अनेक वर्षांमध्ये इतर अनेक सुपरहिट सिनेमी दिले आहेत. तेच या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. ‘लाल सिंग चड्ढा’ची पुढील रिलीज तारीख 14 एप्रिल 2022 रोजी बैसाखीच्या दिवशी ठेवण्यात आली आहे. अतुल कुलकर्णी यांनी एरिक रॉथ यांनी लिहिलेल्या फॉरेस्ट गंप या सहा वेळा अकादमी पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे भारतीय रूपांतर केले आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात आमिर खान आणि करीना कपूर खान मुख्य भूमिकेत आहेत.