• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘द कॉनव्हर्सेशन’ च्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसची मोदींवर टीका

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 23, 2021
in राष्ट्रीय
0
Spread the love

(राजमुद्रा वृत्तसेवा)

भारतात निर्माण झालेल्या कोरोना परिस्थितीवर आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सरकारवर याबाबत टीका होत आहे. जगभरात पसरलेल्या करोना महामारीचा कोणत्या नेतृत्वाने नीट मुकाबला केला. यासंदर्भात ‘द कॉन्व्हर्सेशन’ या वेबसाईटने एक जनमत चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीत निघालेल्या निष्कर्षावरून राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटर वरून चांगलाच टोला लगावला आहे.

“अमेरिकेतील ‘द कॉन्व्हर्सेशन’ वेबसाइटने ट्विटरवर जनमत चाचणी घेतली. कोरोना काळात सर्वांत सुमार कामगिरी करणारे नेते कोण, यावर चाचणी झाली. या चाचणीत मोदींचं नाणं खणखणीत वाजलं. सर्वांत वाईट कामगिरीसाठी त्यांना एकूण (७५,४५०) ९० टक्के मतं मिळाली.” असं ट्विट करता राष्ट्रवादी काँग्रेसने मोदींवर टोला लगावला आहे.

करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांबद्दल अमेरिकेमधील ‘द कॉनव्हर्सेशन’ या वेबसाईटने ट्विटरवर जनमत चाचणी घेतली होती. यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश होता. या ऑनलाइन जनमत चाचणीमध्ये सर्वात वाईट कामगिरी करणारा नेता कोण? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ७५ हजार ४५० जणांनी आपली मतं नोंदवली. त्यापैकी सर्वाधिक मतं म्हणजेच ९० टक्के मतं ही मोदींना मिळाली. म्हणजेच ७५ हजार ४५० जणांपैकी ६७ हजार ९०५ जणांनी मोदी हे जगामध्ये करोना परिस्थिती हाताळण्यात सर्वात वाईट कामगिरी करणारे नेते असल्याचं मतं मांडलं आहे. त्यापाठोपाठ अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ५ टक्के तर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांना ३.७ टक्के मतं मिळाली आहेत. मॅक्सिकोच्या अ‍ॅमलो यांना या पोलमध्ये १.३ टक्के मतं मिळाली आहेत.

Tags: janmat testnarendra modirashtrawadi congressthe conversation
Previous Post

पुणे व्यापारी संघाचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्र

Next Post

महाराष्ट्रात भूकंपाचे सौम्य धक्के, मात्र भीती कायम

Next Post

महाराष्ट्रात भूकंपाचे सौम्य धक्के, मात्र भीती कायम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!