• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रवादी महानगराच्या “त्या” पत्रकामुळे वाद वाढण्याची शक्यता ..?

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 23, 2021
in Uncategorized, जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण | जळगाव जिल्ह्यात सध्या राजकीय वादावादी मुळे या चर्चांना उधाण येत आहे यातच आता राष्ट्रवादीच्या महानगर च्या वतीने काढण्यात आलेल्या पत्रकार मुळे पुन्हा एकदा राजकीय वाद वाढण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी महानगर च्या पत्रकामध्ये अतिशय खडबडीत जनक अशी टीका माजी मंत्री भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. महाजनांवर भाजपच्या अपयशाचे खापर फोडण्यात आले आहे. कट्टर खडसे समर्थक असलेले राष्ट्रवादीचे महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी महाजनांवर टीका –  टिपण्णी करण्याची संपुर्ण पातळी ओलांडल्याने खडसे – महाजन यांच्यात राजकीय वाद वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी महानगराच्या वतीने काढलेल्या पत्रकावरून भाजप पदाधिकारी चांगलेच नाराज झाल्याचे पाहायला मिळत आहे.

काय आहे पत्रकात ?

जळगाव येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस यांच्या सहकार पॅनेलने बहुमताने विजय मिळविला आहे. राज्यभरात भाजपचे गिरीष महाजन यांची नाचक्की झाल्याने महानगरपालिका सत्तांतर प्रकरणानंतर उरली सुरली अब्रूही गेली. असल्याचा टीका राष्ट्रवादी कॉग्रेसने केली आहे. राष्ट्रवादी महानगर चे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी हे पत्रक काढले आहे.

या पत्रकात पुढे असे की,सर्व जागांवर भाजपतर्फे खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, माजी आमदार, माजी पालकमंत्री, विविध प्रदेश व जिल्हा पदाधिकारी असे सक्षम उमेदवार देण्यात आले. ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि पराभव टाळता यावा, यासाठी गिरीष महाजन नाथाभाऊंच्या मागे फिरत होते. नाथाभाऊंच्या ताब्यात मुक्ताईनगर नगरपालिका व कोथळी ग्रामपंचायत नसल्याचे सांगत गिरीष महाजन वलग्ना करत आहेत. नाथभाऊंनी मुक्ताईनगर नगरपालिका स्वतःच्या बळावर बहुमताने निवडून विजय मिळवला. लोकनियुक्त नगराध्यक्षा अपात्र झाल्याने मुक्ताईनगर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा मनीषा प्रवीण पाटिल व कोथळी ग्रामपंचायतीचे सरपंच नारायणदादा चौधरी हे नाथाभाऊंच्या सक्षम नेतृत्वाखाली काम करीत आहेत. ज्या जिल्हा परिषद बाबत गिरीष महाजन बोलत आहेत , ती परिषद सुध्दा नाथाभाऊंच्या जीवावर आजपर्यंत ताब्यात आहे.नाथभाऊंनी जळगाव शहर महानगरपालिकेत भाजपची सत्ता ज्या प्रकारे उलथवून लावली. भाजपचे संख्याबळ ५७ हुन २७ वर आणले व महाराष्ट्रात गिरीष महाजनांची उरली सुरली ईज्जत घालविली. त्या पेक्षाही येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती व दुध विकास फेडरेशन अशा सर्वच ठिकाणी गिरीष महाजन यांचा पराभव करून त्यांना त्यांची औकात दाखवून देऊ अशी खळबळजनक टीका राष्ट्रवादी महानगर ने केल्याने अळी-तळी च्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. जे जिल्हा बँक निवडणुकीत तालुक्यातील निवडणूक लढवू शकले नाही, ते ईतर निवडणुक लढवू शकतील का? असा प्रश्न सर्वानाच पडला आहे. ” भागो भागो ” अशी गत सध्या भाजपची सर्वच निवडणुकीतून झाली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत देखील भाजपला भागो… भागो.. केल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस व आमचे सक्षम नेते नाथाभाऊ राहणार नाही असा ठाम विश्वास आमचा नाथाभाऊंवर आहे. असे पत्रक राष्ट्रवादी काँग्रेस महानगर जळगावतर्फे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, सुनील माळी, अमोल कोल्हे, किरण राजपूत, विशाल देशमुख, सुशील शिंदे, डॉ. रिजवान खाटिक, सुहास चौधरी, अकिल पटेल, नईम खाटिक, राहुल टोके, अनिल पवार आदि पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिले आहे .

Tags: ashok ladvanjaribjpbjp vs mahavikas aaghadieknath khadasegirisha mahajanjalgaonjalgaon ncpkhadse samarthak
Previous Post

राज्य नाट्य स्पर्धेतील प्रवेशिका भरण्याच्या तारखेत वाढ…

Next Post

रस्त्यांच्या कामांचा अद्याप पत्ता नाही; मात्र कामांपूर्वीच सेनेत वाद….

Next Post
रस्त्यांच्या कामांचा अद्याप पत्ता नाही; मात्र कामांपूर्वीच सेनेत वाद….

रस्त्यांच्या कामांचा अद्याप पत्ता नाही; मात्र कामांपूर्वीच सेनेत वाद....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!