• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आभार प्रकट दिन – संत राजिन्दर सिंहजी महाराज

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 24, 2021
in Uncategorized
0
आभार प्रकट दिन – संत राजिन्दर सिंहजी महाराज
Spread the love

अमेरिकेत आभार प्रकट दिनाचे विशेष महत्त्व आहे. हा दिवस युरोप आणि इतर देशांतून आलेल्या लोकांनी अमेरिकेतील लोकांनी त्यांना जी सहाय्यता केली त्यानिमित्त सुरू केला होता, परंतु कालांतराने हा दिवस आभार प्रकटदिनाच्या रुपात प्रचलित होत गेला. बर्‍याचदा जेव्हा आपणास इतरांकडून एखादी वस्तू मिळते, तेव्हा आपण त्यांना धन्यवाद म्हणतो.

आपण सर्वप्रथम पिता-परमेश्वराचे आभार मानले पाहिजे. कारण त्यांनी आपणास हे मानव शरीर दिले आहे. या शरीरात आपण स्वतःला ओळखू शकतो आणि पिता-परमेश्वराला प्राप्त करू शकतो. आपल्या जीवनात प्रभुंनी आपणास अनेक उपलब्धी दिल्या आहेत. जर आपण एक स्वस्थ जीवन व्यतीत करत असू तर, आपणास प्रभूचे आभार मानले पाहिजे. जर आपणास दररोज भोजन मिळत असेल तर त्यासाठी सुद्धा आपण प्रभुंचे आभार मानले पाहिजे. कारण बऱ्याच लोकांच्या नशिबात दोन वेळचे सुद्धा पोटभर भोजन नसते.

जर आपण आर्थिक रूपाने संपन्न असू तर त्याकरिता सुद्धा आपण प्रभुंचे आभार मानले पाहिजे, कारण आपण असे पाहतो की गरीबीमुळे जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा प्रकारे आपण पाहतो की आपल्या जीवनामध्ये प्रभूची अपार कृपा आहे, त्याकरिता केवळ आभार प्रकट दिनी नव्हे तर दररोज प्रभुंचे आभार मानले पाहिजे.

आभार प्रकट दिनी आपण केवळ प्रभु चे धन्यवाद करण्यापुरतेच मर्यादित न राहता या दिवशी आपण हा ही प्रण करावा की, प्रभुकडून मिळालेल्या या खुशीला आपण सर्वांबरोबर वाटूया आणि दुसऱ्यांची सेवा करूया. आपण अनेक प्रकारे जसे की शारीरिक, मानसिक, आर्थिक रूपात आपण सहयोग करू शकतो. जर कोणी आजारी असेल तर आपण त्यांची शारीरिक रूपात मदत करू शकतो. जर कोणी मानसिकरीत्या त्रस्त असेल तर आपण त्यांना सहानुभूती देऊन त्यांची मदत करू शकतो आणि जर कोणी आर्थिक संकटांचा सामना करत असेल तर आपण आपल्या क्षमतेनुसार त्यांची मदत करू शकतो.

चला तर!, आपण या आभार प्रकटदिनी असा संकल्प  करूया की, आपण केवळ प्रभुं कडून मिळालेल्या उपलब्धींचेच आभार प्रकट करतानाच, इतरांना सुद्धा मदत करूया. जर आपण असे केले तर आपल्या लक्षात येईल की, या जगातील कोणतीही व्यक्ती कोणत्याही वस्तू करिता वंचित राहणार नाही. असे केल्याने आपण एका अशा विश्व निर्मितीत मदत करीत आहोत, ज्यामध्ये इतरांना प्रेम देणे आणि एकमेकांची काळजी घेणे महत्त्वपूर्ण असेल. जर प्रत्येक व्यक्तीने असे जीवन जगण्याचा प्रण केला तर आपण पहाल की तो दिवस दूर नाही, जेव्हा या धरतीवर प्रभुचे राज्य स्थापन होईल.

Previous Post

धावत्या रेल्वेखाली आल्याने एका व्यक्तीचा मृत्यू…..

Next Post

सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास परवानगी; कलावंताना मोठा दिलासा…

Next Post
सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास परवानगी; कलावंताना मोठा दिलासा…

सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास परवानगी; कलावंताना मोठा दिलासा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!