• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजप आमदाराने केला खंडणी घेणाऱ्या पोलिसांचा पर्दाफाश….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 25, 2021
in Uncategorized
0
भाजप आमदाराने केला खंडणी घेणाऱ्या पोलिसांचा पर्दाफाश….
Spread the love

चाळीसगाव राजमुद्रा दर्पण । चाळीसगाव तालुक्यातील अवजड वाहनांसाठी बंदी आहे. तरी कन्नड घाटात महाराष्ट्र पोलीस ट्रक चालकांकडून कशा प्रकारे पैसे वसुली करतात याचा व्हिडीओ  समोर आला होता. हा सर्व प्रकार उघड आणण्यासाठी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी वेषांतर करत स्टिंग ऑपरेशन केले. ग्रामीण पोलिसांचा वसुलीचा प्रकार समोर आला आहे.

ग्रामीण भागात गुरे चोरी व इतर गुन्हांचे प्रमाण वाढले आहे. त्याचा तपास करण्यासाठी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना वेळ नाही. परंतु कन्नड घाटात वसुली करण्यासाठी आधिकारी व कर्मचारी स्वता; हजर राहतात. त्यामुळे वसुलीत शामिल सर्व आधिकारी व कर्मचार्‍यांची निलंबनाची मागणी येत्या आधिवेशनात करणार आहे. तसेच तालुक्यात सुरु असलेले अवैद्य धंदे बंद करण्यासाठी माझी मोहिम सुरुच राहणार असे आमदार मंगेश चव्हाण म्हणले.

आमदार मंगेश चव्हाण ड्रायव्हर बनून त्या घाटातून प्रवास केला. पोलिसांना म्हणाले, ‘थोडे कमी करा’ अन् ५०० रुपये पोलिसांच्या हातात दिले. तसेच ‌उर्वरित पैसे परत मागितले असता त्या पोलिसांनी ते देण्यास नकार दिला. नंतर ड्रायव्हर बनलेले आमदार मंगेश चव्हाण यांनी बाजूला उभ्या असलेल्या पोलिसांना जवळ बोलावले व हा बाकी पैसे परत देत नसल्याचे सांगितले, तेव्हा त्यातील एक पोलीस शिवीगाळ करायला लागला मग आमदार मंगेश चव्हाण यांनी खाली उतरून पोलिसांशी बोलायला सुरुवात करताच काही पोलिसांनी आमदारांना ओळखले व त्यांनी तेथून पळ काढला.

दुरुस्तीसाठी अवजड वाहनांना प्रवेश बंद असलेल्या कन्नड घाटात पोलिसांकडून ५०० ते १००० रुपये प्रति अवजड वाहन घेऊन त्यांना सोडण्यात येते, यामुळे अनेकदा घाट जाम होऊन ५ ते १० तास घाट जाम होतो. केवळ वसुलीसाठी प्रवाश्यांच्या जीवाशी खेळाचा प्रकार आमदार मंगेश चव्हाण यांच्या स्टिंग ऑपरेशनमुळे समोर आला आहे.

 

Tags: bjpchalisgaonmangesh chavan
Previous Post

‘अतरंगी रे’ ला डिस्ने प्लस हॉटस्टारने तब्बल 200 कोटींना घेतले विकत ….

Next Post

‘पावनखिंड’चा अजरामर इतिहास लवकरच मोठ्या पडद्यावर…

Next Post
‘पावनखिंड’चा अजरामर इतिहास लवकरच मोठ्या पडद्यावर…

‘पावनखिंड’चा अजरामर इतिहास लवकरच मोठ्या पडद्यावर...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!