(पुणे राजमुद्रा वृत्तसेवा)
”मराठा आरक्षण हा माझा विषय नसून तो राज्याचा आहे” असे पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचे मत असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात एका कार्यक्रमा दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन बोलताना अशी प्रतिक्रिया दिली.
”मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्या रस्त्यावरचे आंदोलन सामुहिक आरोग्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते असा इशारा दिला खासदार संभाजी राजे भोसले यांनी होता. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी याची भेट घ्यायची होती. त्यासाठी पंतप्रधान मोदींशी चार वेळा पत्रव्यवहार झाला असून अद्याप भेटीसाठी वेळ न दिल्याने संभाजीराजे भोसले यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान याबाबत विचारले असता, ”मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजी राजेंनी त्यांचं मत मांडलं, मेटेंनी त्यांचं मत मांडलं. ‘हा विषय माझा नाही, राज्याचा आहे’, असं पंतप्रधान मोदींचे म्हणणं आहे. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांची भेट झाली नाही.” असा खुलासा पाटील यांनी केला आहे.
‘कोरोनासंदर्भातील सर्व नियम पाळून मराठा आरक्षणप्रश्नी येथे पाच जूनला मोर्चा काढणारच असल्याची घोषणा आमदार विनायक मेटे यांनी रविवारी (ता. २३) पत्रकार परिषदेत दिली होती. या विषयाला अनुसरून चंद्रकांत पाटलांनी मेटेनच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत ”जे काही सकारात्मक आणि रचनात्मक आहे त्यात आम्ही पूर्ण ताकदीसह सहभागी होऊ” असे वक्तव्य केले होते.